ओळख लपवून मुलींना फसवणाऱ्या 'मोहम्मद हुसेन'ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    26-Apr-2024
Total Views |
 Bilal
 
दिसपूर : आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये पोलिसांनी मोहम्मद बिलाल हुसेन नावाच्या गुन्हेगाराला अटक केली आहे. बिलाल एका मुलीला आणि तिच्या मैत्रिणींना सायबरस्टॉक करत होता. तो युवतीचे आणि तिच्या मित्रांचे मॉर्फ केलेले आणि अश्लील फोटो बनवून इंटरनेटवर शेअर करून मुलीला त्रास देत होता. बिलालच्या कृत्याला कंटाळून तरुणीने पोलिसांत तक्रार केली होती.
 
गुवाहाटी पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अनेक महिन्यांच्या तपासानंतर आरोपी मोहम्मद बिलाल हुसैन याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सप्टेंबर २०२३ मध्ये सुरू झाली. पीडित तरुणी आणि तिच्या काही कॉलेज मैत्रिणींना वेगवेगळ्या नावाने नको असलेले कॉल आणि मेसेज येऊ लागले. यामध्ये अश्लील मेसेज होते.
 
 
बिलाल या मुलींना कधी नबजीत नाथच्या नावाने तर कधी नबजीत तालुकदारच्या नावाने अश्लील मेसेज आणि मॉर्फ केलेले फोटो पाठवू लागला. बिलाल या मुलींना वेगवेगळ्या नावाने अश्लील मेसेज आणि फोटो पाठवायचा. याबाबत कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्याने मुलींना दिली होती.
 
मोहम्मद बिलाल हुसेनने नाव बदलून पीडित मुलींशी ऑनलाइन मैत्री केल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले आहे. त्याने बनावट ओळख धारण करून मुलीचा विश्वास जिंकला होता. एवढेच नाही तर काही काळ तो तिचे व्हॉट्सॲप अकाउंटही चालवत असे. मात्र, पीडित तरुणी आणि तिच्या मित्रांना तो प्रत्यक्षात दुसराच असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याच्याशी बोलणे बंद केले. यामुळे बिलाल हुसैनला राग आला आणि त्याने या मुलींचे अश्लील फोटो बनवून व्हायरल करण्यास सुरुवात केली.
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव मोहम्मद बिलाल हुसेन असे आहे, तो धुला, आसाम येथे राहतो आणि तो जाणूनबुजून आपली खरी ओळख लपवत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर बिलाल हुसेन हा त्याच्या मूळ गावी धुला दारंग येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर दि. २४ एप्रिल २०२४ रोजी पोलिसांनी त्याला अटक केली.
 
आरोपीने आपला गुन्हा मान्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल फोन आणि मुलींची छेड काढण्यासाठी वापरलेले सिमकार्ड जप्त केले आहे. पोलिसांनी बिलाल हुसैन याला न्यायालयात हजर केले, तेथून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.