ब्युटी पार्लरमध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू; अर्शद, वाहिद, मुजफ्फर आणि अमजदवर गुन्हा दाखल

24 Apr 2024 12:40:17
 Churu Bulbul
 
जयपूर : राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. बुलबुल नावाच्या या महिलेचा मृतदेह ब्युटी पार्लरमध्येच लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणात अर्शद, वाहिद, मुजफ्फर आणि अमजद यांना आरोपी करण्यात आले आहे. या सर्वांवर पीडितेला आत्महत्या करण्यस प्रवृत्त करण्याचा आरोप आहे.
 
ही घटना शनिवार, दि. २० एप्रिल २०२३ घडल्याचे वृत्त आहे. याला 'लव्ह जिहाद' म्हणत हिंदू संघटनांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली आहेत. मंगळवार, दि. २३ एप्रिल २०२४ चुरू बंदचे आवाहन करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना चुरूमधील हॉटेल सन सिटीमध्ये घडली. प्रभाग क्रमांक २७ मध्ये राहणारा बुलबुल रक्षक (२४) हा येथे बांधलेल्या ब्युटी पार्लरमध्ये काम करायची.
 
हे वाचलंत का? -  काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये मुस्लिमांचा मागासवर्गीयांच्या यादीत समावेश; मागासवर्ग आयोगाने घेतला आक्षेप
 
शनिवारी बुलबुल रोजच्यासारखे कामासाठी घरून निघाली. सायंकाळी ती न परतल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. शेवटी ब्युटी पार्लरमध्येच बुलबुलचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. या प्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
 
बुलबुलच्या शोधात कुटुंबीय हॉटेलमध्ये चालत असलेल्या ब्युटी पार्लरमध्ये जात असताना हॉटेलचालक अर्शद, वाहिद आणि मुजफ्फर यांनी त्यांना अडवले, असा आरोप मृतांच्या कुटुंबीयांनी केला आहे. बुलबुलच्या मानेवर आणि हातावर जखमेच्या खुणा होत्या, असा दावाही मृताच्या काकांनी केला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी अर्शद, वाहिद, अमजद आणि मुजफ्फर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
 
हे वाचलंत का? -  व्यक्तीच्या मृत्यूनंतर अर्धी संपत्ती सरकारने जप्त करावी - राहुल गांधींच्या सल्लागाराने मांडली नवीन योजना
 
हॉटेलमध्ये सुरू असलेले पार्लर सील करण्यात आले आहे. बुलबुल अविवाहित होती. मृत्यूच्या २ दिवस आधी बुलबुलने तिचा मोबाईल तोडल्याचा दावाही मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. मोबाईल तोडण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. काही वेळातच बुलबुलचा संशयास्पद मृत्यू शहरात चर्चेचा विषय बनला होता. पोलिसांनी तपास करून दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासनही दिले.
 
 
Powered By Sangraha 9.0