गेल्या १ वर्षात बीएसईत गुंतवणूकदारांना ६०० टक्के परतावा ! समभागधारक मालामाल

    24-Apr-2024
Total Views |

Stock Market
 
 
मुंबई: बीएसई गुंतवणूकीत गेल्या एक वर्षात एक नाही दोन नाही तब्बल ६०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बीएसई शेअर बाजारात काल १० टक्क्यांनी वाढ झाली होती. काल अखेरच्या सत्रात बाजार बंद झाल्यावर आज सकाळी पुन्हा शेअर बाजारात मोठी वाढ झाली आहे.गेल्या महिन्याभरात समभागात ३३ टक्क्यांनी गुंतवणूकदारांना परतावा मिळाला आहे. गेल्या सात महिन्यांत ७२ टक्क्यांहून अधिक परतावा गुंतवणूकदारांना मिळाला असल्याने संपूर्ण वर्षभरात गुंतवणूकदारांना ६०० टक्के परतावा सहभागावर मिळाला आहे.
 
बीएसईतील ही वाढ अर्थव्यवस्थतेतील सकारात्मक बदल,स्थिर आर्थिक परिस्थिती व भारतीय अर्थव्यवस्थेत तेजीने होणारे बदल लक्षात घेता गुंतवणूकदारांना या गोष्टीचा फायदा झाला आहे. इंटरनॅशनल मॉनेटरी फंड व रिझर्व्ह बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी जीडीपी दरवाढ होऊ शकते असे भाकीत केले होते. गुंतवणूकदारांचा वाढलेला विश्वास व देशांतर्गत वाढलेल्या मागणीमुळे भारतीय उत्पादनात वाढ झाली. याचा फायदा भारतीय कंपन्यांच्या समभागात परावर्तित होत समभागात वाढ होत राहीली होती.
 
गेल्या काही दिवसांपासून लार्ज कॅप बरोबरच मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये मोठा परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे. उपलब्ध माहितीनुसार गेल्या वर्षी निफ्टीमध्ये मिडकॅपने गुंतवणूकदारांना ३८ टक्क्यांनी व स्मॉलकॅपमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली,त्यामुळे गुंतवणूकदारांनी संतुलित गुंतवणूक केल्याने बाजारात भांडवली मूल्यात मोठी वाढ झाली आहे.