शेअर बाजार विश्लेषण: बाजार काठावर पास ! ८९.८३ अंशाने वाढ होत सेन्सेक्स ८७३७३८.४५ व निफ्टी ३१.६० अंशाने वाढत २२३६८.०० पातळीवर

रियल्टी समभागात सर्वाधिक वाढ तर ऑटो,एफएमसीजी,आयटी समभागात नुकसान

    23-Apr-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांक काठावर पास झाले आहेत असे म्हणावे लागेल. काल चार दिवसांच्या घसरणीनंतर बाजार स्थिरावले होते. मुख्यतः मध्यपूर्वेतील इस्त्राईल व इराण यांच्यातील धुमश्चक्रीनंतर परिस्थिती सुधारता काल बाजारात गुंतवणूकदारांनी आशेने कंपन्यांच्या तिमाही निकालावर लक्ष केंद्रित करत सकारात्मकता दर्शवली होती. आज अखेरच्या टप्प्यात बाजार काठावर वधारले आहे. सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात आज तुलनेने वाढ झाली आहे. एस अँड पी बीएसई सेन्सेक्स निर्देशांकात आज ८९.८३ अंशाने वाढ होत सेन्सेक्स ७३७३८.४५ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी ५० निर्देशांक ३१.६० अंशाने वाढत २२३६८.०० पातळीवर स्थिरावला आहे.
 
आज सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात अनुक्रमे ०.१२ व ०.१४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बीएसई व एनएसईच्या बँक निर्देशांकातदेखील आज वाढ झाली आहे. बीएसई बँक निर्देशांकात ९७.४१ अंशाने वाढ होत ५४३१९.१३ पातळीवर निर्देशांक पोहोचला आहे. निफ्टी बँक निर्देशांक ४५.५५ अंशाने वाढत ४७९७०.४५ पातळीवर पोहोचला आहे. बीएसई मिडकॅपमध्ये ०.५२ टक्क्यांनी व स्मॉलकॅपमध्ये १.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तज्ञांच्या मते आगामी काही काळात स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूकदारांचा कल दिसण्याची दाट शक्यता आहे. आजही स्मॉलकॅपचा करिश्मा कायम राहिला आहे.
 
एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.७३ १.१४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसईत क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये संमिश्र प्रतिसाद असला तरी बहुतांश समभागात आज वाढ झाली. सर्वाधिक वाढ रिअल्टी (२.५८%) समभागात झाली आहे.आज बहुतांश समभागात किरकोळ हालचाल झाली असली तरी रिअल्टी समभाग उसळल्याने आज बाजारात किंचित रॅली पहायला मिळाली आहे. याव्यतिरिक्त ऑटो (०.४७%) एफएमसीजी (०.७६%) आयटी (०.५२ %) मिडिया (०.५३%) समभागात वाढ झाली आहे.सर्वाधिक नुकसान आज गुंतवणूकदारांना फार्मा (०.९६%), हेल्थकेअर (०.९५ %) मेटल (०.३४%) , ऑइल गॅस (०.७३ %) समभागात झाले आहे.
 
बीएसईत आज एकूण ३९३४ कंपनीच्या समभागाचे ट्रेडिंग झाले होते. त्यामधील २३३७ समभाग आज वधारले असून १४७५ समभागात आज घसरण झाली आहे. २५७ समभाग आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक मूल्यांकनात पोहोचले आहेत. ९ समभागांचे मूल्यांकन ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरले आहे.एकूण समभागापैकी ७ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले असून ४ समभाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
एनएसईत आज २७१६ समभागांचे आज ट्रेडिंग झाले असताना १६०३ समभाग आज वधारले आहे. १००१ सभभागात आज घसरण झाली आहे. ३७७ समभागांचे मूल्यांकन आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक मूल्यांकनावर पोहोचले आहे. २७१ समभागाचे मूल्यांकन आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक कमी राहिले आहे.१८२ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले असून ३१ समभाग आज लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
बीएसईतील कंपन्याचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ३९९.६७ लाख कोटींवर पोहोचले आहे.एनएसईतील कंपन्याचे बाजार भांडवल ३९६.४६ लाखांवर पोहोचले आहे.
 
आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ८३.३४ प्रति डॉलर पर्यंत गेली होती. आज डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया स्थिर राहिला आहे. आज रुपयांच्या मूल्यांकनात कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही.अखेरच्या टप्प्यात भारतीय रुपया ३ पैशाने वधारून ८३.३४ रुपयांवर स्थिरावला आहे.
 
जागतिक पातळीवरील सोनाच्या स्थितीत कुठलाही विशेष बदल न घडल्याने आज युएस स्पॉट सोने निर्देशांक ५७ अंशाने घसरत २३३४ डॉलर्सवर पोहोचला आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमिश्र वातावरणात आशियाई बाजारात सोन्याच्या भावात घट झाली आहे. भारतातील एमसीएक्सवरील सोने निर्देशांकात आज ०.९६ टक्क्यांनी घट होत भाव ७०५१२.०० पातळीवर पोहोचले आहेत.देशातील एकूणच सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम सरासरी दर १५०० रूपयांनी घसरले आहेत.
 
जागतिक पातळीवरील क्रूड तेलाच्या निर्देशांकात आज घसरण कायम राहिली आहे. स्थिर पुरवठा व मध्यपूर्वेतील वातावरण स्थिर राहिल्याने आज बाजारात क्रूड स्वस्त झाले आहे. क्रूड तेलाच्या WTI Future निर्देशांकात आज ०.२४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड निर्देशांकात आज ०.१७ टक्क्यांनी घसरण झाली आहे. भारतीय बाजारपेठेत एमसीएक्स क्रूड निर्देशांकात ०.१८ टक्क्यांनी घट होत क्रूडचे भाव ६८२२ रुपये प्रति बॅरेलवर भाव पोहोचले आहेत.
 
आज एनएसईवरील माहितीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी आज २९१५.२३ कोटींचे समभाग आज विकले असुन देशांतर्गत गुंतवणूकदारांनी आज ३५४२.९३ कोटींचे समभाग आज विकत घेतले होते. आज बाजारातील भारतीय अर्थव्यवस्थेची चांगली स्थिती व चौथ्या तिमाही निकालाचे सकारात्मक आकडे पाहता आज बाजार वधारले आहे. अमेरिकन फेड दर लवकर कपात होण्याची शक्यता धूसर झाल्याने गुंतवणूकदारांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील हालचालींना अधिक महत्त्व दिले आहे.आज भारतातील पीएमआय आकडेवारी जाहीर झाल्याने भारतीय अर्थव्यवस्था गेल्या १४ वर्षातील सर्वोत्तम स्थितीत असल्याचे एचएसबीसी पीएमआय इंडेक्स अहवालात म्हटले आहे.
 
आज अमेरिकेतील DoW, S & P 500, NASDAQ, युरोपातील FTSE 100 ,DAX , CAC 40 हे सगळेच्या सगळे बाजार आज उसळले होते. आशियाई बाजारात NIKKEI, HANG SENG वगळता केवळ SHANGHAI बाजारात घसरण झाली होती.
 
बीएसईत आज भारती एअरटेल, मारूती सुझुकी, नेस्ले, टाका मोटर्स, एचसीएलटेक, एनटीपीसी एशियन पेंटस, एसबीआय, एचयुएल, आयटीसी इन्फोसिस, टायटन,पॉवर ग्रीड,आयसीआयसीआय बँक, विप्रो या समभागात वाढ झाली आहे तर सनफार्मा,एम अँड एम,रिलायन्स,टेकमहिंद्रा,एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह,जेएसडब्लू स्टील,अल्ट्राटेक सिमेंट,बजाज फायनान्स, टाटा स्टील, इंडसइंड बँक या समभागात आज घसरण झाली आहे.
 
एनएसईत आज ग्रासीम,भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, मारूती सुझुकी, टाटा मोटर्स, आयशर मोटर्स, एचसीएलटेक, एनटीपीसी, एशियन पेंटस, टायटन, ब्रिटानिया, हिरो मोटोकॉर्प, पॉवर ग्रीड, टीसीएस या समभाग आज वधारले आहेत तर सनफार्मा, बीपीसीएल, डॉ रेड्डीज, हिंदाल्को, अपोलो हॉस्पिटल, एम अँड एम, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, टेकएम, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट,कोल इंडिया, इंडसइंड बँक या समभागात आज गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेलिएटिव रिसर्च निरज शर्मा म्हणाले, ' मंगळवारी देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क, जागतिक बाजारातील मजबूत ट्रेंडमुळे सलग तिसऱ्या दिवशी वाढ होत राहिले. अस्थिरता निर्देशांक, इंडिया VIX, १९.७२ % घसरून १०.२० वर स्थिरावला, जो बाजारातील कमी अस्थिरता दर्शवतो. शेवटी, निफ्टी २२३६८ वर सकारात्मक नोटवर बंद झाला. तांत्रिकदृष्ट्या, मजबूत पुलबॅक रॅलीनंतर, निर्देशांक २२५००-२२५३० पातळीच्या जवळ थांबण्याची शक्यता आहे. निर्देशांक २२५३० च्या वर टिकून राहिल्यास, निफ्टी २२५७६ चा सर्वकालीन उच्चांक तोडण्याचा प्रयत्न करू शकेल; अन्यथा, निर्देशांक 22,000-22,500 झोनमध्ये एकत्रीकरणाचा साक्षीदार होऊ शकतो.
 
निफ्टीसाठी अल्पकालीन समर्थन पातळी २२२०० आणि २२००० आहेत, तर प्रतिकार पातळी २२४५० आणि २२५३० आहे,निफ्टी बँक निर्देशांक वरच्या अंतराने उघडला आणि ४८३०० च्या अडथळ्याचा सामना केला, काही प्रमाणात नफा बुकिंग दिसून आले. परिणामी, निर्देशांक किरकोळ वाढीसह ४७९७० वर स्थिरावला. तांत्रिकदृष्ट्या, ४८३०० –४८५००० हा निर्देशांकासाठी अल्पकालीन अडथळा म्हणून काम करेल. बँक निफ्टी ४८५०० च्या वर टिकून राहिल्यास रॅली ४९०००-४९५०० च्या पातळीवर वाढू शकते. बँक निफ्टीसाठी अल्पकालीन समर्थन पातळी ४७००० आणि ४६००० वर दर्शविली आहेत, तर प्रतिकार पातळी ४८३००आणि ४८५००आहेत.'
 
आजच्या बाजारावर प्रतिक्रिया देताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, ' एका अस्थिर दिवसानंतर हेडलाइन निर्देशांक निफ्टी ५० आणि सेन्सेक्स अनुक्रमे ०.१२ % आणि ०.१० % किरकोळ वाढीसह बंद झाले. तथापि, मिडकॅप व स्मॉलकॅप आणि मायक्रोकॅप निर्देशांकांनी 1% पेक्षा जास्त चढाई केल्यामुळे व्यापक बाजारपेठांमध्ये मोठी कारवाई दिसून आली.रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) प्रसिद्धीच्या झोतात आली होती, कारण देशातील सर्वात मोठ्या कंपनीने काल बंद झाल्यानंतर त्यांचे Q4FY24 आणि FY24 चे निकाल नोंदवले. रस्त्याच्या अपेक्षेनुसार एकूण संख्या असूनही, RIL १.३९ % खाली बंद झाला. M&M फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स ५.५२ % घसरले कारण कंपनीने KYC फसवणुकीच्या कारणास्तव त्याचे निकाल कळवण्यास उशीर केल्याने रु. ईशान्य शाखेत १५० कोटी शोधले जात आहेत.
 
बीएसई लिमिटेड भारती एअरटेल आणि इंडस टॉवरसह १२.२% वाढून बंद झाले. काल Vodafone Idea च्या एफपीओ ( FPO) च्या यशस्वी पूर्ततेच्या पार्श्वभूमीवरनंतर व्याज खरेदी करण्यात आले. वरची वाटचाल सकारात्मक भावना आणि या क्षेत्राबद्दलच्या उज्ज्वल दृष्टिकोनावर आधारित होती.'
 
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी प्रतिक्रिया देताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले,' देशांतर्गत बाजारपेठेने श्रेणी-बद्ध कामगिरीचे प्रदर्शन केले, व्यापक बाजाराच्या सातत्यपूर्ण कामगिरीसह सकारात्मक जागतिक संकेतांचा मागोवा घेतला. इराण आणि इस्रायलमधील तणाव मर्यादित वाढ झाल्याचे समजले जात असताना, क्रूडच्या किंमतीतील वाढ गुंतवणूकदारांना जोखमीचे पुनर्मूल्यांकन सुचवते. उच्च पातळीसह डॉलर इंडेक्स आणि यूएस बॉण्ड यिल्ड,FII कडून बहिर्वाह सुरू राहण्याची अपेक्षा आहे, परंतु DII कडून येणारा प्रवाह रिकव्हरीला पाठिंबा देत आहे."
 
बँक निफ्टी निर्देशांकाविषयी प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट कुणाल शहा म्हणाले,' "बँक निफ्टी निर्देशांकाने सकारात्मक सुरुवातीनंतर एका बाजूच्या व्यापार सत्राचा अनुभव घेतला, ज्यामध्ये अस्वल उच्च स्तरावर वर्चस्व गाजवत आहेत.असे असूनही, एकूण भावना तेजीत राहिली आहे, हे सूचित करते की घसरण ही खरेदीच्या संधी म्हणून पाहिली पाहिजे. ४७८०० च्या आसपास मजबूत समर्थन दिसून आले.४७७०० झोन तथापि, तात्काळ अडथळा ४८२०० -४८५०० वर आहे.'
 
आज सोन्याच्या भावातील घसरणीवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी यांनी सांगितले की, ' सोन्याच्या किमतींनी त्यांची घसरण सुरूच ठेवली, एमसीएक्समध्ये ८५० रुपयांची आणखी घसरण होऊन ७०३५० प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचली. या घसरणीचे श्रेय कॉमेक्स गोल्डमध्ये तीव्र घसरणीमुळे होते, जे दोन दिवसांच्या कालावधीत २३०० डॉलरच्या खाली घसरले. इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांनी पुढील ड्रोन हल्ले करण्यापासून परावृत्त केल्याने आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या किमती वाढल्या होत्या, तथापि, किंमती यापेक्षा कमी झाल्यास एमसीएक्सवर (MCX) मध्ये सोन्याच्या किमतीला समर्थन मिळू शकते पातळी,६८५०० च्या दिशेने आणखी एक विक्री होऊ शकते, कारण मध्य पूर्वेची जोखीम भावना थंड होते."
 
बाजारातील निफ्टीविषयक प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले,'निफ्टी संपूर्ण सत्रात बाजूला राहिला कारण तो कोणताही दिशात्मक ब्रेकआउट प्रदान करण्यात अयशस्वी ठरला. तथापि, एकूणच कल सकारात्मक राहिला कारण निर्देशांक गंभीर मूव्हिंग सरासरीच्या वर बंद झाला. ६० च्या खाली रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) खाली वाचनसह तेजीचा क्रॉसओवर दर्शवित आहे. वरच्या टोकाला, २२३५० -२२४०० ची रेंज रेझिस्टन्स झोन म्हणून काम करेल; पातळीमुळे तेजीची भावना कमकुवत होऊ शकते.'