मंदिरातील भाविकांना बेशुध्द करण्यासाठी कट्टरपंथीयांनी फेकले मांसाचे तुकडे!

    02-Apr-2024
Total Views |
minor-throw-meat-at-hindu-temple


नवी दिल्ली :     राजस्थानमधील जयपूरमध्ये मंदिरात मांसाचे तुकडे फेकल्याची घटना समोर आली आहे. सदर प्रकारानंतर स्थानिक हिंदू समाजातील लोकांनी संघटित होत घडलेल्या प्रकाराचा निषेध केला आहे. मंदिरात मांसाचे तुकडे फेकणाऱ्या कट्टरपंथीयांना स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या कट्टरपंथीयांतील तिघेही अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.


 

दरम्यान, मंदिरात मांसाचे तुकडे फेकण्याचे कारण म्हणजे कट्टरपंथीयांना मंदिरात येणाऱ्या भाविकांना बेशुध्द करण्याचा कट होता. दि. २९ मार्च २०२४ रोजी घडल्याचे सांगण्यात येत असून मंदिरात मांसाचे तुकडे फेकल्यानंतर परिसर पुन्हा एकदा धुवून स्वच्छ करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सदर घटना जयपूरच्या भट्टा बस्ती भागात घडली आहे. दि. ३१ मार्च रोजी सकाळच्या सुमारास भाविकांना मंदिरात मांसाचे तुकडे पडल्याचे दिसले आहे.


हे वाचलंत का? - तुम्हीही ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम बाळगत आहात! पहा महिलेसोबत काय घडलं?


मंदिरात मांसाचे तुकडे पडल्याचे दिसताच स्थानिक हिंदू भाविकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर काही वेळातच मंदिरात लोकांची गर्दी होऊ लागली. दरम्यान, परिसरातील हिंदू संघटनांच्या सदस्यांना याची माहिती मिळताच त्यांनी सदर कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, मंदिराच्या आतील भागाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भट्टा बस्ती येथील रहिवासी असलेल्या ७० वर्षीय दमयंती यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरू केला. स्थानिक रहिवासी यांनी तक्रार दाखल करताच पोलिस अधिकाऱ्यांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले. या व्हिडिओंमध्ये तीन अल्पवयीन दिसत होते, ज्यांचे वय १० ते १२ वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. तिघांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, अल्पवयीन मुलांनी सांगितले की, त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला होता. ज्यात मंदिरात मांस फेकल्यामुळे हिंदू बेशुद्ध झाल्याचे दाखवण्यात आले होते.