मोदी सरकारच्या काळात रेल्वे क्षेत्राचा कायापालट!

    02-Apr-2024
Total Views |
how-modi-government-changed-indian-railway
 

नवी दिल्ली :      मोदी सरकारमधील भारतीय रेल्वेच्या कायापालटाकरिता राबविण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प वंदे भारत एक्सप्रेस संख्येत वाढ होत आहे. देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कोटींमध्ये असून त्यांना दर्जेदार प्रवासाकरिता सुविधा सरकारकडून पुरविण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मोदी सरकारच्या गेल्या काही वर्षात भारतीय रेल्वेचा नवा अवतार समोर आला आहे.
दरम्यान, मोदी सरकारच्या काळात रेल्वेत वंदे भारत गाड्या दाखल झाल्या आहेत. याच वंदे भारत एक्सप्रेसमुळे सामान्य प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळू लागल्या आहेत. आजमितीस भारतीय रेल्वेचा कायापालट होत असून वंदे भारत गाड्या, धूरविरहित इंजिन, इलेक्ट्रिक गाड्या आणि भव्य नवीन रेल्वे स्थानके ही रेल्वेची ओळख आहे. रेल्वेच्या माध्यमातून काश्मीरला देशाच्या इतर भागांशीही रेल्वेने जोडण्यात आले आहे.


रेल्वेमार्गांच्या विद्युतीकरणात वाढ

मोदी सरकारच्या काळात रेल्वेचे विद्युतीकरण मोठ्या प्रमाणावर झाले असून सरकारच्या माध्यमातून विद्युतीकरणाचे काम युध्दपातळीवर हाती घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आजमितीस देशातील ९४% रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले आहे. देशातील १४ राज्यांमध्ये १०० टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. केवळ गेल्या १० वर्षात मोदी सरकारने रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरण जलदगतीने केले आहे.

सध्या देशांतर्गत रेल्वेमार्गांवर नवीन गाड्या चालविण्यात येत असून मोदी सरकार जुनी व्यवस्था बदलत असताना नव्या गाड्याही आणत आहे. मेड इन इंडिया अंतर्गत वंदे भारत एक्सप्रेस आता देशातील जनतेला जलद वाहतुकीसाठी मदत करत आहे. मोदी सरकारच्या काळात देशाला गतिमान एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस या गाड्याही मिळाल्या असून वंदे भारतचा आकडा अवघ्या गेल्या ४ ते ५ वर्षांत ५१ वर पोहोचला आहे.