लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी आणले पोतं भरून चिल्लर! कर्मचाऱ्यांची दमछाक

    02-Apr-2024
Total Views |
 
Manoj Geda
 
यवतमाळ : राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्षातील उमेदवारांनी आपापले अर्ज भरण्यास सुरुवातही केली आहे. दरम्यान, अशातच यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून एक अजब प्रकार पुढे आला आहे. इथे एका उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी चक्क पोतं भरुन चिल्लर आणले होते.
 
लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या असून निवडणूकीला काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. राजकीय पक्षांनी आपापले उमेदवारही जाहीर केले आहेत. याशिवाय निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे.
 
हे वाचलंत का? -  "कैसे हाथ बदलेगा हालात?" राहूल गांधींना शेलारांचा टोला
 
अशातच यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्यासाठी एका उमेदवाराने पोतं भरून चिल्लर आणले होते. मनोज गेडा असे या उमेदवाराचे नाव असून त्याने १२ हजार ५०० रुपयांचे चिल्लर आणल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हे पैसे मोजताना निवडणूक कर्मचाऱ्यांची पार दमछाक उडाली होती. हा प्रकार पाहून अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' या चित्रपटाची आठवण झाल्याचे बोलले जात आहे.