मुंबई : 'राहूल गांधी, कैसे हाथ बदलेगा हालात?,' अशी कविता करत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आशिष शेलार यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर एक कविता शेअर केली असून यात त्यांनी काँग्रेस आणि राहूल गांधींवर जोरदार निशाणा साधला.
एका पाठोपाठ भ्रष्टाचारी चालले जेलात... रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?
बियर, व्हिस्की, वाईन पेग रिचवले.. आता यांचे पाय अडकले खोलात
रागा, कैसे हाथ बदलेगा हालात?
हिंदुहृदयसम्राटांनी ज्या हाताला फटकारले.. बाप-बेटे अडकले त्याच भ्रष्टाचारी "हाता"च्या गोलात
संपूर्ण राज्यात सध्या लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्ष लोकसभा निवडणूकीच्या तयारीला लागले असून जोरदार प्रचारही करण्यात येत आहे. दरम्यान, आता आशिष शेलार यांनी राहूल गांधी आणि काँग्रेसवर कवितेतून हल्लाबोल केला आहे.
याशिवाय त्यांनी काँग्रेसचे चिन्ह असलेल्या हातावरही टीका केली. राहूल गांधी तुमचा हात परिस्थिती कशी बदलेल? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच "हिंदुहृदयसम्राटांनी ज्या हाताला फटकारले, बाप-बेटे अडकले त्याच भ्रष्टाचारी हाताच्या गोलात," असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.