वसंत मोरे पुण्यातून वंचितचे उमेदवार, बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाठिंबा!

    02-Apr-2024
Total Views |
Vasant More VBA Candidates
 

मुंबई :    वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी मंगळवार, दि. २ एप्रिल रोजी जाहीर केली. या यादीत एकूण पाच उमेदवारांचा समावेश असून, मनसेतून बाहेर पडलेल्या वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी देण्यात आली आहे.
 
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार) उमेदवाराला बारामतीमधून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर, नांदेड अविनाश भोसीकर, परभणी बाबासाहेब उगाळे, छत्रपती संभाजीनगर अफसर खान, पुणे वसंत मोरे आणि शिरूरमधून मंगलदास बागुल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


हे वाचलंत का? - रमाबाई आंबेडकर नगरमधील १० हजार झोपड्यांचे सर्वेक्षण!


राज्यात ओपिनियन आणि एक्झिट पोलला निवडणूक कालावधीत प्रतिबंध

लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर निवडणूक आयोगाने प्रतिबंध केला आहे. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून, दि. १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात १९ एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपासून १ जून २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोलवर प्रतिबंध लागू राहणार आहे.

त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी ४८ तासांच्या कालावधीत ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असे निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.