"सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना सीतामाईंबद्दल कळवळा कसा?"

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा शरद पवारांवर हल्लाबोल

    19-Apr-2024
Total Views |
Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar


मुंबई :
राम मंदिरात सीतामाईची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. त्यामुळे पवारांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बावनकुळे म्हणाले की, एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात. त्यामुळे शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच आहे.

शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत पण पवारांना फक्त राजकारण करण्यात रस आहे. त्यामुळे जे शरद पवार निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना सीतामाईंबद्दल कळवळा कसा, अशी सवाल ही बावनकुळे यांनी विचारला.