१५ एप्रिलपासून ' हे ' दोन आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुले होणार

NSE - SME अंतर्गत नोंदणीकृत होणार

    13-Apr-2024
Total Views |

IPO
 
IPO Update-  
 
मुंबई: १५ एप्रिलपासून ग्राहकांच्या भेटीसाठी दोन आयपीओ (IPO) बाजारात दाखल होत आहेत.रामदेवबाबा सॉल्व्हन्ट प्रायव्हेट लिमिटेड व ग्रील स्प्लेंडर सर्विसेस लिमिटेड या दोन कंपन्यांचा आयपीओ दाखल होणार आहेत.
 

रामदेवबाबा सॉल्व्हन्ट प्रायव्हेट लिमिटेड -
 
या कंपनीचा आयपीओमध्ये ५९.१४ लाख समभागांचा फ्रेश इश्यू गुंतवणूकदारांना उपलब्ध असणार आहे.आयपीओची तारीख १५ ते १८ एप्रिल असणार आहे. १९ एप्रिलपासून कंपनीच्या समभागांचे वितरण निश्चित होऊ शकते.एनएसई-एसएमई (NSE-SME) या विभागात या कंपनीची नोंदणी होणार आहे. कंपनीचा आयपीओमध्ये प्राईज बँड ८० ते ८५ रुपये प्रति समभाग एवढा निश्चित करण्यात आला आहे.
 
गुंतवणूकदारांना कमीत कमी १६०० समभागांचा गठ्ठा (Lot) गुंतवणूकीसाठी विकत घ्यावे लागणार आहे. कमीत कमी गुंतवणूकीची मर्यादा १३६००० रुपये असणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
 
कंपनीतर्फे Choice Capital Advisors Pvt Ltd ही कंपनी या आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे. तसेच Bigshare Services Pvt Ltd ही कंपनी इश्यूसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे.कंपनीसाठी मार्केट मेकर म्हणून Choice Equity Broking काम पाहणार आहे.
 
या आयपीओत समभागाचे दर्शनी मूल्य (Face value) प्रति १० रूपये असणार आहे. एकूण ५०.२७ कोटी मूल्यांकनाचे समभाग विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (Qualified Institutional Buyer) कडून एकूण आयपीओमधील ५० टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्यात येऊ शकते तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ही मर्यादा ३५ टक्के निश्चित करण्यात आली आहे.विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (Non Institutional Investors) साठी ही मर्यादा १५ टक्क्यांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
 
आयपीओपूर्वी कंपनी १४.२८ कोटी रूपयांची गुंतवणूक अँकर गुंतवणूकदार (खाजगी गुंतवणूकदार) यांच्याकडून उभी करणार आहे. २००८ साली स्थापन झालेली ही रामदेवबाबा कंपनी रिफाईंन राईस ब्रान ऑइल बनवते. कंपनी हे तेल एफएमसीजी (Fast Moving Consumer Goods) कंपन्यांना तयार करून देते. याशिवाय संबंधित उत्पादनांचे कंपनी उत्पादन व वितरण करते. कंपनीचा प्रकल्प महाडुला व दुसरा प्रकल्प नागपूर जवळ ब्रम्हपुरी येथे महाराष्ट्रात आहे.
 
मार्च ३१ २०२२ ते मार्च ३१, २०२३ रामदेवबाबा कंपनीचे महसूल २०.३५ टक्क्यांनी वाढून करोत्तर नफ्यात (Profit After Tax) ९७.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ३१ मार्च २०२३ मधील ७०४३३.४१ कोटीवरून कमी होत कंपनीचा महसूल ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ४६५६९.८१ कोटी झाला होता. कंपनीचा करोत्तर नफा ३१ मार्च २०२३ पर्यंत १३००.१५ कोटींहून कमी होत ८२८.९० कोटींवर पोहोचले आहे.
 
कंपनीचे एकूण बाजारी भांडवल (Market Capitalisation) १८८.०७ कोटी रुपये इतके आहे. कंपनीतर्फे सांगण्यात आल्याप्रमाणे, या आयपीओतील मिळालेल्या निधीचा वापर कंपनीचा नवा प्रकल्प सुरू करण्यासाठी, तसेच कंपनीची थकित देयके देण्यासाठी, वर्किंग कॅपिटल गरजेसाठी व दैनंदिन कामकाजासाठी वापरला जाणार आहे. कंपनीच्या प्रमोटर (संस्थापक) प्रशांत किसनलाल भैय्या, निलेश सुरेश मोहोटा, तुषार रमेश मोहोटा हे आहेत
 
 
२) ग्रिन स्प्लेंडर सर्विसेस लिमिटेड - (Birrdy's IPO) - या कंपनीचा आयपीओ १५ एप्रिल ते १८ एप्रिलपर्यंत असणार आहे. १९ एप्रिलपर्यंत कंपनीच्या आयपीओचे वितरण निश्चित करण्यात येईल. हा आयपीओ एनएसई - एसएमई (NSE - SME) या विभागात नोंदणीकृत होणार आहे. कंपनीकडून समभागाचा प्राईज बँड १२० रूपये प्रति समभाग निश्चित केला गेला आहे.
 
कमीतकमी १२०० समभागांचा गठ्ठा (Lot) गुंतवणूकदारांना खरेदी करावा लागणार आहे. किरकोळ गुंतवणूकीसाठी कमीत कमी १४४००० रुपयांची गुंतवणूक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. Inventure Merchant Broker Services Pvt Ltd ही संस्था बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Bigshare Services Pvt Ltd कंपनी आयपीओची रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. मार्केट मेकर म्हणून Rikhav Securities काम पाहणार आहे.
 
कंपनीच्या समभागाचे दर्शनी मूल्य (Face Value) १० रूपये आहे. १९ तारखेला पात्र गुंतवणूकदारांना या समभागाचे वाटप होण्याची शक्यता आहे. पात्र न ठरलेल्या गुंतवणूकदारांना २२ एप्रिलपासून परतावा मिळणार आहे. कंपनी गुंतवणूकदारांसाठी एक्सचेंजवर २३ एप्रिलपासून नोंदणीकृत होणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना एकूण गुंतवणूकीपैकी ५० टक्के गुंतवणूक करता येणार आहे.
 
नोव्हेंबर २०१९ साली या कंपनीची सुरुवात झाली होती. कंपनीचा बेकरी व पेसट्रीचा व्यवसाय आहे. बर्डी नावाच्या ब्रँड अंतर्गत कंपनीचा व्यवसाय चालतो. मुंबईत कंपनीची १७ आउटलेट आहेत. केक व्यतिरिक्त इतर फूड बिझनेसमध्ये कंपनीचा व्यवसाय अंतर्भूत आहे. कंपनीचे प्रमोटर (संस्थापक) श्रीनिधी राव, वंदना श्रीनिधी राव, विवेक विजयकुमार सूद आहेत.
 
कंपनीची महसूल आर्थिक वर्ष २०२३ नोव्हेंबरपर्यंत ८८५.६३ कोटी रुपये होते. ३१ मार्चमध्ये कंपनीचे महसूल उत्पन्न १५३१.६२ रुपये होते. ३१ मार्च २०२३ मधील कंपनीचा करोत्तर नफा (Profit After Tax) १९९.१० कोटी होता. परंतु नोव्हेंबर ३१ पर्यंत तो घटून ६१.२५ कोटी रुपये झाला होता.३१ नोव्हेंबर २०२३ पर्यंत कंपनीचे मूल्यांकन ४९८.९८ कोटी होते.
 
कंपनीचे एकूण बाजारी भांडवल (Market Capitalisation) ६२.५ कोटी रूपये आहे. कंपनीने म्हटल्याप्रमाणे, आयपीओतील मिळालेल्या निधीचा वापर कंपनी अधिकच्या वर्किंग कॅपिटल गरजेसाठी व थकबाकीसाठी व दैनंदिन कामकाजासाठी करणार आहे.