वर्षा गायकवाड नॉट रिचेबल! मुंबई काँग्रेसची बैठक रद्द

10 Apr 2024 17:28:05
 
Varsha Gaikwad
 
मुंबई : लोकसभा निवडणुकांची सुरुवात व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या सकाळपासून नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसची बैठकही रद्द करण्यात आली आहे. मुंबईतील जागावाटपावरून काँग्रेस पक्षात नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
 
बुधवारी मुंबई काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, अध्यक्षा वर्षा गायकवाड या बैठकीला उपस्थित झाल्या नाही. त्यामुळे त्यांना अनेक फोनही करण्यात आले. दरम्यान, सकाळपासून त्यांचा फोनही नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय त्यांनी कुणालाच भेटही दिली नसल्याचे बोलले जात आहे.
 
हे वाचलंत का? - माझ्या नादी लागू नका! आम्ही कपडे फाडण्यात एक्स्पर्ट आहोत : प्रकाश आंबेडकर
 
महाविकास आघाडीचे अंतिम जागावाटप मंगळवारी जाहीर करण्यात आले. मात्र, यावरुन काँग्रेसमध्ये अंतर्गत धूसफूस पाहायला मिळत आहे. या जागावाटपावरून काँग्रेसचे अनेक नेते नाराज असल्याची माहिती पुढे आली आहे. याशिवाय मुंबईतील जागावाटपावरुन काँग्रेस नाराज असल्याचं बोललं जात आहे. यातच मुंबईतील ४ जागा उबाठा गटाकडे गेल्या आहेत. दरम्यान, सकाळपासून वर्षा गायकवाड कुणाचेच फोन घेत नसल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात नेमकं चाललंय काय? आणि गायकवाडांची पुढची भूमिका काय असेल? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0