माझ्या नादी लागू नका! आम्ही कपडे फाडण्यात एक्स्पर्ट आहोत : प्रकाश आंबेडकर

    10-Apr-2024
Total Views |
 
Prakash Ambedkar & Vijay Wadettivar
 
मुंबई : माझ्या नादी लागू नका. आम्ही कपडे फाडण्यात एक्स्पर्ट आहोत, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिला आहे. विजय वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेला त्यांनी बुधवारी जोरदार प्रत्युत्तर दिले.
 
विजय वडेट्टीवार यांनी "आम्ही त्यांना साक्षगंध होण्याच्या पुर्वीपासूनच पसंत करुन ठेवलं होतं. त्यांनी लग्नासाठी का नकार दिला माहिती नाही. त्यांना अपेक्षित असलेल्या हुंड्याबाबत चर्चा करायची होती. पण त्यांना तो न मिळाल्याने त्यांनी कदाचित लग्न तोडलं असावं," अशी खोचक टीका प्रकाश आंबेडकरांवर केली होती.
 
हे वाचलंत का? -  माघार घेऊ नका! विजय शिवतारेंना मध्यरात्री फोन; अजितदादांचा खुलासा
 
यावर प्रत्युत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "निवडणूकीमध्ये जागांचा समझौता होतो. कालपर्यंत त्यांचंच जागावाटप झालेलं नव्हतं. त्यामुळे अशा माणसांनी हुंड्याची चर्चाच करु नये. मी काढायला गेलो तर त्यांना बाहेर फिरणंही कठीण होईल. वंचितच्या नादी लागू नका आम्ही कपडे फाडण्यात एक्स्पर्ट आहोत," असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.