नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या जात पडताळणी प्रकरणाची याचिका फेटाळला असून त्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना महाविकास आघाडीकडून रामटेक लोसकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली होती. परंतू, त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचा अर्ज नाकारण्यात आला. त्यानंतर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महायूतीकडून शिवसेनेच्या राजू पारवे यांना रामटेक लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे.
हे वाचलंत का? - "प्रेम म्हणजे प्रेम असतं, यांचं आणि त्यांचं सेम नसतं!"
रश्मी बर्वे यांनी जातपडताळणी प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी अर्ज रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती केली होती. पण उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, बुधवारी सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळत सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.