"प्रेम म्हणजे प्रेम असतं, यांचं आणि त्यांचं सेम नसतं!"
आशिष शेलारांचा ठाकरेंना कवितेून टोला
10-Apr-2024
Total Views |
मुंबई : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं यांचं आणि त्यांचं सेम नसतं, असे म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. यांचं प्रेम बिनशर्त असतं आणि त्यांचं मुख्यमंत्री पद मागतं, असेही त्यांनी आपल्या कवितेत म्हटले आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत ठाकरेंवर निशाणा साधला.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं "यांच" आणि "त्यांच" सेम नसतं !
काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात? काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात? असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे ! तरीसुद्धा, तरीसुद्धा
आशिष शेलार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं यांचं आणि त्यांचं सेम नसतं. यांचं बिनशर्त असतं आणि त्यांचं मुख्यमंत्री पद मागतं. त्यासाठी देव, देश आणि धर्मावर पाणी ही सोडत," असे म्हणत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी गुढीपाडवा मेळाव्यात महायूतीला पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांनी आपण महायूतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे सांगितले. दरम्यान, आता यावरुन आशिष शेलारांनी एक कविता शेअर करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.