काँग्रेसला सुप्रीम कोर्टाचा दिलासा!, आयकर विभागाकडून लोकसभा निवडणुकीपर्यंत मुदतवाढ

    01-Apr-2024
Total Views |
congress-currently-gets-relief-from-supreme-court 


नवी दिल्ली :     काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून करवसुलीकरिता दोनदा नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी करण्यात आली असून काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सर्वोच्च न्यायालयात आयकर विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच, आताच ३५०० कोटी रुपयांची करवसुली करणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षातर्फे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी कोर्टात युक्तिवाद केला. ते म्हणाले, आयकर विभागाकडून मालमत्ता जप्त करून १३५ कोटी रुपये आधीच जमा केले आहेत. तसेच, काँग्रेस ही नफा कमावणारी संघटना नसून फक्त एक राजकीय पक्ष आहे. तसेच, दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या प्रकरणी पुढील सुनावणी दि. २४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.

 
हे वाचलंत का? - दिल्ली मद्य घोटाळा : केजरीवाल यांनी ईडीसमोर 'या' दोन मंत्र्यांची नावे घेतली!


आयकर विभागाकडून ३५०० कोटी रुपयांची करवसुलीची नोटीस मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून काँग्रेसला तूर्तास दिलासा मिळाला आहे. सुनावणीदरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसविरोधात कोणतीही कारवाई करणार नाही. कारण काँग्रेस पक्षासाठी त्रास निर्माण करायचा नाही, असे आयकर विभागाकडून न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला आहे.
 
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आयकर विभागाच्या वतीने कोर्टात युक्तिवाद केला तर अभिषेक मनू सिंघवी यांनी काँग्रेस पक्षाकडून कोर्टात आपली बाजू मांडली. सदर प्रकरणी पुढील सुनावणी दि. २४ जुलै रोजी होणार आहे. तुर्तास तरी काँग्रेसला करवसुली प्रकरणात दिलासा मिळाला असला तरी पुढील सुनावणी नेमकं कोर्ट काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान, नोटीसमध्ये वर्षानुसार, आयकर विभागाने २०१४-१५ साठी ६६३ कोटी रुपये, २०१५-१६ साठी सुमारे ६६४ कोटी रुपये आणि २०१६-१७ साठी सुमारे ४१७ कोटी रुपये करवसुली आहे.