दिल्ली मद्य घोटाळा : केजरीवाल यांनी ईडीसमोर 'या' दोन मंत्र्यांची नावे घेतली!

    01-Apr-2024
Total Views |
ed-arvind-kejriwal-took-the-names
 
 
नवी दिल्ली :     दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आता न्यायालयाकडून १५ दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली असून केजरीवालांची ईडीकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, केजरीवालांनी ईडी चौकशीत दोन मंत्र्यांची नावे घेतली आहेत.
दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी सुनावणी पार पडली यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत १५ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालय(ईडी)कडून सांगण्यात आले की, चौकशीदरम्यान केजरीवालांनी मंत्री सौरभ भारद्वाज व आतिशी यांची नावे घेतली आहेत. अशी माहिती ईडीने कोर्टासमोर मांडली आहे.
 
 
हे वाचलंत का? - ज्ञानवापी खटल्याशी अन्सारीचा संबंध!, 'मुस्लिम पक्षाला...'


ईडीकडून कोर्टात सांगण्यात आले की, चौकशीदरम्यान केजरीवालांनी दिल्ली मद्य घोटाळ्याचा सूत्रधार विजय नायर हे सौरभ भारद्वाज व आतिशी यांना सपोर्ट करत असत. ईडीकडून कोर्टात जेव्हा सदर मुद्दा मांडण्यात आला तेव्हा केजरीवाल न्यायालयात काही बोलले नाहीत. यापूर्वी, ५ ऑक्टोबर २०२३ रोजी दिल्ली सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी विजय नायर हे सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांना रिपोर्ट करायचे, असे सिंघवी यांनी कोर्टात सांगितले होते.
 
मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीच्या राऊस् एव्हेन्यू कोर्टात १ एप्रिल रोजी सुनावणी पार पडली. यावेळी झालेल्या सुनावणीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत १५ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या सुनावणीत ईडीकडून चौकशीवेळी प्राप्त झालेली माहिती कोर्टात सादर केली. दरम्यान, ईडीने सांगितले की, चौकशीदरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्यांचे दोन सहकारी मंत्री सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांची नावे घेतली आहेत. ईडीने प्रथमच या दोघांची नावे न्यायालयात मांडली आहेत.


केजरीवाल यांची रवानगी तिहारमध्ये!

मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात राऊज एव्हेन्यू न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालयाने ईडीची विनंती मान्य करून केजरीवाल यांना १५ दिवसांची न्यायालयीने कोठडी सुनावली आहे. त्यानंतर केजरीवाल यांनी रवानगी तिहार कारागृहात करण्यात आली आहे.