सेबीकडून गुंतवणूकदारांसाठी महत्वाची घोषणा ! तक्रार निवारणासाठी सेबीचे नवे व्यासपीठ

सेबीकडून गुंतवणूकदारांसाठी महत्वाची घोषणा ! तक्रार निवारणासाठी सेबीचे नवे व्यासपीठ

    01-Apr-2024
Total Views |

SEBI
 
 
मुंबई: १ एप्रिलला सेबीने गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. सेबीने ग्राहकांचे गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी ऑनलाईन तक्रारींचे निवारण करण्यासाठी सेबी कंप्लेंट रिड्रेस सिस्टीम (SCORES) या व्यासपीठाचे अनावरण केले आहे. ग्राहकांना गुंतवणूकीबाबत कुठलीही तक्रार असल्यास गुंतवणूकदार आपली तक्रार युआरएल (URL) व अँपच्या माध्यमातून सेबी (सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) कडे नोंदणी करु शकणार आहेत.
 
यासंबंधीचे वृत्त पीटीआयने दिले आहे. सेबीने या व्यासपीठाच्या नवीन आवृत्तीचे अनावरण केल्याने गुंतवणूकदारांना सोयीप्रमाणे आता सेबीकडे तक्रार दाखल करता येणार आहे
 
सेबीने आपल्या निवेदनात म्हटल्यानुसार, SCORES ची नवीन आवृत्ती ऑटो-राउटिंग, ऑटो-एस्केलेशन, नियुक्त संस्थांद्वारे देखरेख आणि टाइमलाइन कमी करून प्रक्रिया अधिक कार्यक्षम करून सिक्युरिटीज मार्केटमधील गुंतवणूकदार तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करते.' असे म्हटले आहे.
 
१ एप्रिलपासून केवळ नव्या आवृत्तीत गुंतवणूकदारांना तक्रार नोंदणी करत येणार आहे. जुन्या आवृत्तीत यापुढे तक्रार करता येणार नसल्याचे सांगितले आहे. परंतु पूर्वीच्या तक्रारचे स्टेट्स जुन्या आवृत्तीत बघता येणार आहे. या नव्या आवृत्तीत तक्रार दाखल झाल्यावर २१ दिवसांच्या आत तक्रारीचे निवारण सेबीकडून करण्यात येणार आहे. ही नवीन आवृत्तीत केवायसी डेटा इंटिग्रेशनची सुविधा असल्याने ग्राहकांना सोप्या पध्दतीने आता रजिस्ट्रेशन ( नोंदणी) करता येणार आहे.