पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते मुश्ताक बाबा यांची अधिकृत निवड करण्यात आल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केली.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुश्ताक बाबा यांची रिपाइं च्या अल्पसंख्यांक आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याची माहिती रिपाइं चे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित
Read More
ज्ञानदानाचे व्रत हाती घेऊन, दिव्यांगांचे आयुष्य उजळून टाकण्यासाठी स्वतःच्या अधुपणावर मात करत समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या बाळासाहेब सोनवणे यांच्याविषयी...
(Santosh Deshmukh Case) बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. अजूनही बीडमध्ये संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनं सुरु आहेत. अशातच आता या प्रकरणातील पहिला जामीन मंजूर झाला आहे.मकोका लावण्यात आलेल्या आरोपी सिद्धार्थ सोनवणेला केज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्याच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याने सीआयडीने आरोपपत्रात त्याच्या नावाचा समावेश केलेला नाही. २५ हजारांच्या जातमुचालक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी धनुष्यबाण हाती घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
(Santosh Deshmukh Murder Case Update) बीड जिल्ह्यात मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रमुख आरोपींसह देशमुखांचे लोकेशन देणाऱ्यालाही स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. देशमुख यांची ज्याने टीप दिली तो सिद्धार्थ सोनवणे त्यांच्या अंत्यविधीलाही हजर असल्याची माहिती समोर आली आहे.
(Santosh Deshmukh Murder Case) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून ताब्यात घेतल्यानंतर शनिवार, दि. ४ जानेवारी रोजी सिद्धार्थ सोनवणे याला मुंबई येथून अटक करण्यात आली. या तीनही आरोपींना केज येथील न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. १८ जानेवारीपर्यंत 'सीआयडी' कोठडी सुनावली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी अपक्ष अर्ज दाखल करून निवडणूक लढवली. परंतु, या अपक्ष उमेदवारांमधून केवळ दोघांनाच निवडणूक जिंकून आमदार होण्याचा मान मिळवता आला. यातील एक नाव म्हणजे जुन्नर मतदारसंघाचे विजयी उमेदवार शरद सोनवणे. विद्यमान आमदाराची थेट तिसर्या क्रमांकावर रवानगी करणारे, तसेच साखर कारखान्याच्या संचालकाला धूळ चारत विजयी मताधिक्य मिळवणारे शरद सोनवणे नक्की आहेत तरी कोण? त्यांच्या विजयाची कारणं काय आहेत? याबाबतच्या विश्लेषणात्मक सविस्तर माहितीचा आढावा.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी अपक्ष अर्ज दाखल करुन निवडणूक लढवली. परंतु या अपक्ष उमेदवारांमधून केवळ दोघांनाच निवडणूक जिंकून आमदार होण्याचा मान मिळवता आला. यातलंच एक नाव म्हणजे जुन्नर मतदारसंघाचे विजयी उमेदवार शरद सोनवणे. कोण आहेत शरद सोनवणे? विद्यमान आमदाराची थेट तिसऱ्या क्रमांकावर रवानगी करणारे, तसेच साखर कारखान्याच्या संचालकाला धूळ चारत विजयी मताधिक्य मिळवणारे शरद सोनवणे ( Sharad Sonawane ) नक्की आहेत तरी कोण ? त्यांच्या विजयाची कारणं काय आहेत ? हेच जाणून घेऊया या व्हिडिओतून
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे ( Election ) निकाल जाहीर झाले असून, यंदा केवळ दोन अपक्ष उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा अपक्षांचा बोलबाला असल्याचे यापूर्वीच्या निकालांतून दिसून आले आहे. यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही एकूण २ हजार, ८६ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यात काही बंडखोरांचादेखील समावेश होता. मात्र, फक्त दोनच अपक्षांना यावेळी विजय मिळवता आला आहे.
(Jitendra Sonawane)भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे मुंबई सचिव तथा दै. ‘मुंबई तरुण भारत’चे ऑपरेशन्स मॅनेजर जितेंद्र कानिफनाथ सोनावणे यांची मुंबई शहर जिल्ह्याच्या नियोजन समितीवर विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह एकूण १२ जणांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. गुरुवार, दि. १९ सप्टेंबर रोजी राज्याच्या नियोजन विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला.
आजच्या काळातील आजच्या जोडप्यांची कथा आणि व्यथा असलेला "एक दोन तीन चार" या चित्रपटाचा अफलातून ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण नार्वेकर यांनी केले असून कथा निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकरांनी मिळून लिहिली आहे.
बीड लोकसभा मतदारसंघासाठी महाविकाश आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. भाजपने खासदार प्रितम मुंडेंच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडुन ज्योती मेटे ( Jyoti mete ) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासोबत त्यांच्या चर्चा सुरु होत्या त्यामुळे त्यांना तिकीट मिळेल असं बोललं जात होत.
योग हा आरोग्य आणि मनःशांतीसाठी उपयुक्तच. तथापि, कर्करोगाशी लढा देणार्या व्यक्तीसाठी योगासने किती लाभकारक असतात, हे सिद्ध करणार्या डॉ. मनीषा सोनवणे यांच्याविषयी...
अनेक गरजूंना मदत करून, उच्च शिक्षण घेऊन, गरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्धी मिळालेले डॉ. अभिजित सोनावणे यांच्याबद्दल..
रुपाली सोनवणे यांनी ‘वाचनवेल प्रतिष्ठान’च्या माध्यमातून केवळ ४० सदस्यांच्या विश्वासाच्या शिदोरीवर २०१८ मध्ये ‘पुस्तक भिशी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. त्यांच्या या अभिनव उपक्रमाविषयी...
कुपोषण निर्मुलन काळाची गरज असून, त्यासाठी सर्वांनी सक्रिय होणे आवश्यक आहे. कुपोषणमुक्तीसाठी महिला सक्रिय झाल्या असून त्यांच्या योगदानातुनच हा उपक्रम यशस्वी होत असल्याचे अधोरेखित झाले आहे.महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या संयुक्त विद्यमाने ’पोषण पंधरवडा 2023’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत, बुधवार, दि. 12 एप्रिल रोजी सह्याद्री सभागृह, सह्याद्री शाळा, भांडूप पश्चिम येथे कुपोषण निर्मूलनासंदर्भात झालेल्या कार्यक्रमाला महिला शक्तीचा उदंड प्रतिसाद मिळाला.‘कुपोषणावर क
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेला धारावी परिसर कात टाकत असून, सोमवार, दि. २७ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमातून धारावीत कुपोषणमुक्तीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.‘कुपोषणावर करू मात, ताजे सकस अन्न खाऊ आहारात’, ‘स्वस्थ माता स्वस्थ बालक’ अशा घोषणेने धारावीचा परिसर दुमदुमून गेला. महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या संयुक्त विद्यमाने ’पोषण पंधरवडा २०२३’ चा शुभारंभ येथील श्री गणेश विद्यामंदिरात करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून जनसेवा न्यासाची स्थापना १९९७ मध्ये झाली. प्रामुख्याने समाजातील दुर्बल आणि गरजू मुलांना शिक्षणाबरोबरच स्वावलंबन आणि प्रशिक्षण देण्याच्या हेतूने अनेक उपक्रम सुरू झाले आहेत. नावातच लोकसेवेचा संकेत असलेले जनसेवा न्यास हे पुण्यातील नागरी परिसरात असलेल्या वंचितांच्या सेवेसाठी तत्पर असलेले संघटन आहे. अण्णा वाळिंबे आणि अतुल लिमये यांच्या पुढाकारात सुरु झालेले हे सेवाकार्य आता त्या भागातील वंचित कुटुंबात सकारात्मकतेची भावना निर्माण करते आहे.
विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण मिळावे यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१४ साली कौशल्य विकास केंद्राची स्थापना केली असून या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच मागील तीन वर्षात केंद्राच्या माध्यमातून पाच संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले असून या माध्यमातून या कौशल्य शिक्षणाच्या कक्षा अधिक रुंदावण्यात येत आहेत.
संभाजीनगर येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील अभियंता युवक दीपक सोनवणेचा काही दिवसांपूर्वी त्याचा इस्लाम धर्मात धर्मांतरण करण्यासाठी छळ, आर्थिक फसवणूक आणि मारहाण झाल्यासंदर्भातील प्रकरण उघडकीस आले होते. दै. ‘मुंबई तरुण भारत’नेही या संवेदनशील प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सदरचे वृत्त शनिवार, दि. 19 नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महाराष्ट्रभर हे प्रकरण गाजले होते. अखेरीस शुक्रवार, दि. 2 डिसेंबर रोजी पोलिसांकडून या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर ‘अॅट्रोसिटी’ कलमांसह गुन्ह
कोरोनासारख्या संकटाच्या काळात आपल्या सेवेने नाशिक येथील तरुण सेवक अनिकेत सोनवणे यांनी अनेकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम केले. कित्येक गरजूंना त्यांनी मदतीचा हात दिला आणि त्यांच्या पाठिशी ते अगदी खंबीरपणे उभे राहिले. अन्नपदार्थांच्या वाटपापासून ते रुग्णांना रुग्णालयात ‘ऑक्सिजन’ पुरवण्यापर्यंत सोनवणे हे गरजूंचा आधारवड ठरले. तेव्हा, सर्वार्थाने गरजूंसाठी ‘देवदूत’ ठरलेल्या अनिकेत सोनवणे यांच्याविषयी...
आर्थिक अडचणी असतानाही परदेशात ‘मास्टर्स’ पदव्या मिळवून यशस्वी झालेल्या कल्याणच्या धनंजय रूपश्री एकनाथ सोनवणे यांच्याविषयी...
जातीपातीपलीकडे जाऊन शाश्वत मानवी मूल्य जपत स्वत:चे आयुष्य घडवत, समाजाला प्रेरणा देणार्या अनामिका सोनवणे-यादव यांच्या कर्तृत्वाचा घेतलेला आढावा...
अवघ्या विश्वाचे कल्याण करायला जमणार नाही. मात्र, आपल्या स्तरावर सर्व मांगल्याची भावना आणि कार्य करणारे कुर्ला टर्मिनसचे स्टेशन डायरेक्टर सुरेश सोनवणे यांच्याविषयी...
राष्ट्रपिता महात्मा गांधींचे विचार नव्या पिढीला समजेल आणि रुजेल अशा पद्धतीने मांडून त्याची वर्तमानातील समस्यांशी सांगड घालत जगभ्रमंती करणार्या शांतिदूत नितीन सोनवणे या तरुणाबद्दल..
"आज वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिकतेचे वाढते प्रमाण चिंताजनक असून त्याची मुळे खोलवर रुजलेली आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांनी रविवारी केले.
रुग्णसेवेसोबत अनेक डॉक्टरांनी समाजसेवेचेही व्रत हाती घेतलेले दिसते. पण, फक्त रस्त्यावरील गरीब-भिकाऱ्यांच्या वैद्यकीय सेवेसाठीच तत्पर असे डॉक्टर दिसत नाहीत. पण, याला अपवाद ठरले ते डॉ. अभिजित सोनावणे.
२०१४च्या निवडणुकीत पंकजा मुंडेंनी माझ्या विरोधात काम केले होते, ते माझं काहीही ऐकत नसल्याने आपण राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला असल्याचे मेटे यांनी काल बीड येथील भाषणात सांगितले.
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी आज सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेला धक्का बसला असून विधानसभेतील मनसेची पाटी कोरी झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आमदार सोनवणेंना शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश दिला.
बीड जिल्ह्यातील शिरूरच्या तागडगाव गावात निसर्गप्रेमी दाम्पत्याने वन्यप्राण्यांचे अनाथालय उभे केले आहे. हे अनाथालय उभे करणाऱ्या जोडप्याचे नाव आहे सिद्धार्थ आणि सृष्टी सोनावणे.
‘जळगाव तरूण भारत’ने शेंदुर्णी येथे मंगळवार, १६ ऑक्टोबर रोजी राणी लक्ष्मीबाई महिला सह. पतसंस्थेच्या सहकार्याने आयोजित अल्पना कला स्पर्धाअंतर्गत घेतलेल्या रांगोळी स्पर्धेत कीर्ती योगेश तायडे यांनी प्रथम तर द्वितीय पुरस्कार नेहा विजय सोनवणे यांनी पटकावला. तृतीयस्थानी शुभदा भगवान बैरागी राहिल्या. पारस जैन मंगल कार्यालयात अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धेत सुमारे ८७ स्पर्धक सहभागी झाले होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
मोहाडी गावाला ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. जि.प.च्या सर्वसाधारण सभेत याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
केरळातील निसर्गाचा प्रकोप थरकाप उडवणारा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उपांग असलेल्या राष्ट्रीय सेवा भारतीचे कार्यकर्ते इथे सैन्याच्या खांद्याला खांदा लावून मदतकार्यात लागलेले आहेत.
अमृत अभियानांतर्गत निधीवाटपासाठी निवड झालेल्या सर्व शहरांतून वीजबचतीचा ‘जळगाव पॅटर्न’ लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
प्रतापदादा सोनावणे यांनी माघार घेण्यासाठी भाजपाचे पक्ष पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्नाना अपयश
कधीकाळी क्लास दोन ऑफिसर असलेले, पण आज परिस्थितीमुळे मंदिरामध्ये भीक मागण्याची वेळ आली.
मनपाच्या शनिवारी, ५ रोजी झालेल्या सभेत २७ नगरसेवकांना परस्पर मानधन देण्यात आल्याचा मुद्दा गाजला.
Jalgaon, Kailas Sonawane, 4 Lacs rs.
गाळेधारक कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे व सदस्य यांनी महापौर ललित कोल्हे यांना गाळेधारकांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
या वर्षीपासून नॉन बीटी बियाणे बीटी बियाणांमध्ये मिसळून देण्यात येणार असल्याने ते पेरल्यावर बोंड अळीचा प्रादुर्भाव खूपच कमी होईल. यादृष्टिने यावर्षी कृषी विभागातील अधिकार्यांनी लागवड होण्यापूर्वी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे,