क्रांती रेडकरला पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी

09 Mar 2024 18:14:33
समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरला पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.
 

kranti redkar 
 
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिला पाकिस्तानातून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. या धक्कादायक प्रकरणाची तिने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. क्रांतीला (Kranti Redkar) विविध पाकिस्तानी आणि ब्रिटिश नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे समोर आले आहे. या जीवे मारण्याच्या धमक्या ६ मार्चपासून व्हॉट्सॲपवर मेसेज स्वरुपात येत आहे. तर याआधी गेल्या वर्षी जूनमध्येही समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणात क्रांतीने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.
 
हे वाचलंत का? -  शाहरुख खानचा 'तो' डायलॉग 'रोडसाईड टाईप'! समीर वानखेडे संतापले!
 
क्रांती रेडकरने याबाबत पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मला ६ मार्चपासूनच धमक्या आणि आक्षेपार्ह भाषेतील व्हॉट्सॲप मेसेज येऊ लागले होते. यातील बहुतांश मेसेज पाकिस्तान आणि ब्रिटनमधील क्रमांकांवरून आले आहेत. क्रांतीने गोरेगाव येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच, तिने ट्विट देखील कली आहे.
 
क्रांतीने पोस्टमध्ये काय लिहिले?
 
क्रांतीने ट्वीट करत याबाबत भाष्य केलं आहे. “माझ्या मोबाईल नंबरवर विविध पाकिस्तानी नंबर आणि ब्रिटनमधून मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हे फक्त तुमच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे. हे गेल्या एक वर्षापासून होत आहे. पोलिसांना वेळोवेळी कळविण्यात आले”, असे लिहित क्रांतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई पोलिसांना देखील टॅग केलं आहे.
 
 
 
दरम्यान, वानखेडे कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२३ मध्ये जूनमध्ये समीर वानखडे आणि क्रांती रेडकर यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देण्यात आली होती. यासाठी ट्विटरच्या बनावट अकाऊंटचा देखील वापर करण्यात आला होता.
Powered By Sangraha 9.0