मुंबई : शाहरुख खानच्या जवान चित्रपटातील बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर या संवादावर आर्यन खानच्या केसवर काम करणारे माजी एंटी-ड्रग ऑफिसर समीर वानखेडे यांनी त्यांचे मत मांडले आहे. शाहरुखच्या जवान चित्रपटातील हा संवाद खरं तर अप्रत्यक्षरित्या समीर वानखेडे यांनाच टोमणा होता हे जगजाहीर असून हा संवाद एक ‘रोडसाईड संवाद’ आहे असे ठामपणे समीर वानखेडे यांनी एका मुलाखतीत म्हटले.
मेन्स एक्सपीला दिलेल्या मुलाखतीत समीर वानखेडे म्हणाले की, "मी सहसा चित्रपट पाहात नाही आणि जवान तर मुळीच पाहिला नाही. पण तरी जरा का कोणी माझ्यावर थेट निशाणा साधत असेल तर त्यांना मी इतकचं सांगू इच्छितो की आजवर मी अधिकारी म्हणून माझे काम पुर्ण निष्ठेने केले आहे. आणि मी आर्यनच्या केसमध्ये केवळ माझे कर्तव्य पुर्ण केले. पुढे ते असं देखील म्हणाले की, आजवर मी अनेक घरे जाळली त्याच जळालेल्या घरांवर नाच केला आहे.त्यामुळे मला घाबरवण्याचा प्रयत्न कुणी करु नये”. आणि या प्रकरणावर भाष्य करू शकत नाही. पण याआधी २-३ वेळा आम्ही भेटलो, त्या भेटी खूप व्यवस्थित होत्या. शाहरुख खान मला चांगलं ओळखतात आणि मीही त्यांना चांगलं ओळखतो. त्यामुळे आर्यनच्या केसमध्ये मी माझ्या भारतमातेसाठी माझे कर्तव्य पुर्ण केले आहे”.
२०२१ साली समीर वानखेडेंच्या नेतृत्वात एनसीबीने मुंबईतील एका क्रूझवर छापा टाकला होता. यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. देशभर या प्रकरणामुळे खळबळ माजली होती. या कारवाईनंतर समीर वानखेडे देशभर चर्चेत आले होते. पुढे न्यायालयीन सुनावणी दरम्यान आर्यन खान याची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर न्यायालयाने समीर वानखेडेंच्या टीमवर जोरदार ताशेरे देखील ओढले होते.
दरम्यान, एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडून २५ कोटींच्या लाचेची मागणी केल्याचा गंभीर आरोप देखील केला होता. त्याच प्रकरणात आता सीबीआयने समीर वानखेडे यांच्या घरावर छापा टाकत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.