"एकदा हातात सत्ता द्या, सगळे..."; काय म्हणाले राज ठाकरे?

09 Mar 2024 13:45:45

Raj Thackeray


नाशिक :
एकदा माझ्या हातात सत्ता द्या सगळे भोंगे बंद करतो, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी नाशिक येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
 
राज ठाकरे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये भोंग्यांविषयी बोलल्यावर माझ्या १७ हजार महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या होत्या आणि ते स्वत:ला हिंदुत्ववादी सांगतात. तुमच्या सर्वांच्या कष्टाने एकदा हे राज्य माझ्या हातात द्या सगळे भोंगे एकसाथ बंद करुन टाकतो."
 
हे वाचलंत का? - काँग्रेसमध्ये बरेच सुपारीबहाद्दुर आणि भुरटे चोर! मविआतील बड्या नेत्याचा आरोप
"आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १८ वर्षे पुर्ण होत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक प्रमुख शहरामध्ये दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करायचा असं आम्ही यावेळी ठरवलं आहे. राजकारणात राहायचं असेल तर त्यासाठी पेशन्स असावा लागतो. गेल्या १८ वर्षात मी अनेक चढउतार पहिले. या संपुर्ण चढउतारामध्ये तुम्ही सगळे माझ्याबरोबर राहिलात. मी तुम्हाला यश मिळवून देणार म्हणजे देणार. पण त्यासाठी पेशन्स लागतो," असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
 
हे वाचलंत का? - "लाचारीचं दुसरं नाव म्हणजे उद्धव ठाकरे!"
ते पुढे म्हणाले की, "माझ्या बाबतीत सोशल मीडियावर काही काही टाकलं जात आहे. गाडी येते, दरवाजा उघडतो, मी खाली उतरतो आणि मागे रा रा रा रा रा चालू असतं. अरे काय आहे? यातून तुमच्या आणि माझ्या हाताला काय लागलं? काहीतरी आपल्या गाडी दाखवायच्या, लाईट दाखवायचे, माणसं उतरताना दाखवायचे, कोणीही ते पाहत नाही. तुम्ही पक्षाच्या नावाने सोशल मीडियावर तुमचा कंटेट लोकांपर्यंत पाठवत असाल तर लोकं पाहत नाही. त्यातून त्यांना काही गोष्ट ऐकायला, पाहायला मिळणार असेल तरच लोकं ते पाहतात," असेही ते म्हणाले.



Powered By Sangraha 9.0