मुंबई : लाचारीचं दुसरं नाव आता उद्धव ठाकरे असं झालेलं आहे. १० जनपथमध्ये बसलेल्या मातोश्रीच्या नवीन मम्मीसमोर किती झुकावं लागतं हे लोकसभेच्या जागा जाहीर झाल्यावर दिसेल, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. त्यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला.
नितेश राणे म्हणाले की, "काही दिवसांपासून बंटी आणि बबली राज्यात दौरा करत आहेत. सगळीकडे दौरा करून भाजप पक्ष आणि मोदीजी, अमित शाह, आणि देवेंद्रजींवर गरळ ओकण्याशिवाय किंवा त्यांना शिव्याशाप देण्याशिवाय हे बंटी आणि बबली दुसरं काहीच करत नाहीत."
ते पुढे म्हणाले की, "लाचारीचं दुसरं नाव आता उद्धव ठाकरे असं झालेलं आहे. कारण १० जनपथमध्ये बसलेल्या मातोश्रीच्या नवीन मम्मीसमोर किती झुकावं लागतं हे लोकसभेच्या जागा जाहीर झाल्यावर दिसेल. महाविकास आघाडीची सत्ता असताना वाकून वाकून गळ्यात बेल्ट लावावा लागला आणि तो आता गायब झाला आहे. ज्यावेळी जनतेला मुख्यमंत्री म्हणून आधार देण्याची गरज होती त्यावेळी गळ्याला बेल्ट लावण्याचं नाटक केलं आणि घर सोडण्याचीही हिंमत दाखवली नाही," असा टोलाही त्यांनी लगावला.