देवेंद्र फडणवीस झाले गीतकार, महाशिवरात्रीनिमित्त ‘देवाधी देवा’ गाणं प्रदर्शित

08 Mar 2024 17:35:38
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘देवाधी देवा’ या नव्या गाण्याचे बोल लिहिले असून अमृता फडणवीस आणि शंकर महादेवन यांनी हे गाणे गायले आहे.
 

devendra fadnavis 
 
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dcm Devendra Fadnavis) राज्याचा कारभार सुरळीतपणे हाताळत आहेतच. एक उत्तम राजकारणी अशी त्यांची ओळख असून त्यांच्यातील आणखी एक सुप्त गुण समोर आला आहे. महाशिवरात्रीनिमित्त ‘देवाधी देवा’ हे गाणे प्रदर्शित झाले असून या गाण्याचे शब्द देवेंद्र फडणवीस (Dcm Devendra Fadnavis) यांनी लिहिले आहेत. शंकर महादेवन आणि अमृता फडणवीस यांच्या आवाजातील गाण्याला फडणवीस यांच्या शब्दाची लागलेली जोड अधिकच मधूर वाटत आहे. ‘देवाधी देवा’ या गाण्याचे बोल देवेंद्र फडणवीस ()Dcm Devendra Fadnavis यांचे असून संगीतबद्ध शंकर महादेवन यांनी केले आहे.
 
हे वाचलंत का? -  मित्रपक्षांना सन्मानजनक जागा मिळणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
 
 
दरम्यान, यापुर्वी देखील अमृता फडणवीस यांनी 'वो तेरे प्यार का गम', 'शिव तांडव स्रोतम', 'तेरी मेरी फिर से', 'बेटिया', ही गाणी गायली असून श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद या गाण्यांना मिळाला आहे. तसेच, ‘देवाधी देवा’ या गाण्याला देखील सोशल मिडियावर उत्कृष्ट दाद मिळताना दिसत आहे.
Powered By Sangraha 9.0