'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देणारा 'राहुल गांधीं'चा निकटवर्तीय? गांधींसह काँग्रेस नेत्यांसोबत फोटो व्हायरल

07 Mar 2024 17:32:12
 BJP
 
बंगळुरू : कर्नाटक विधानसभेत पाकिस्तानच्या समर्थनार्थ झालेल्या घोषणांवरून भाजपने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी गुरुवारी, दि. ७ मार्च २०२४ भाजप पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर गंभीर आरोप केले. गौरव भाटिया यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा उल्लेख भारत तोडो अन्याय यात्रा असा केला.
 

BJP 
 
गौरव भाटिया म्हणाले की, "जेव्हा भाजपने हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा कर्नाटक सरकारने स्वतःला वाचवण्यासाठी तीन जणांना अटक केली. त्यात मोहम्मद इल्ताज, मुनव्वर अहमद आणि मोहम्मद शफी यांचा समावेश आहे. यावेळी गौरव भाटिया यांनी राहुल गांधींसोबत मोहम्मद इल्ताजचा फोटो दाखवताना सांगितले की, 'भारत तोडो' यात्रेदरम्यान पाकिस्तान झिंदाबादचा नारा देणारा देशद्रोही राहुल गांधींना मिठी मारत आहे."
 
हे वाचलंत का? -  राहुल गांधींतर्फे लोकसभेसाठी आश्वासनांची खैरात; काय आहे काँग्रेसचा जाहीरनामा...
 
गौरव भाटिया यांनी काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, नसीर हुसेन, अजय माकन, सॅम पित्रोदा, शशी थरूर आणि डीके शिवकुमार यांच्यासोबत मोहम्मद इल्ताज यांचा फोटो दाखवला. भारताविरोधात बोलणाऱ्याला मिठी मारली जाते, त्यामुळे काँग्रेसच्या यात्रेला 'भारत तोडो अन्याय यात्रा' असे म्हटले पाहिजे, असे वक्तव्य गौरव भाटिया यांनी केले.
 
गेल्या आठवड्यात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या विजयानंतर कर्नाटक विधानसभेत पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोहम्मद इल्ताज, मुनव्वर अहमद आणि मोहम्मद शफी यांचा समावेश आहे. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील मंत्र्यांनी आधी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा लागवण्यात आल्या नाहीत, असे वक्तव्य केले होते. नंतर मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा लावण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली.
 
 
Powered By Sangraha 9.0