'मोऱ्या' चित्रपटाच्या मदतीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

06 Mar 2024 16:22:46
सेन्सॉर बोर्डाच्या लढ्यातून मुक्ती मिळत प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
 

morya movie 
 
मुंबई : सफाई कामगारांचे जीवन आणि त्यांचा संघर्ष मांडणारा मोऱ्या चित्रपट गेल्या काही काळापासून सेन्सॉर बोर्डाची लढाई लढत होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी या विषयात लक्ष देत अखेर या चित्रपटाच्या अडचणींना सोडवत प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला आहे. सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रदीर्घ संघर्ष केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी (Cm Eknath Shinde) सेन्सॉरच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत तीन वर्षांनी 'मोऱ्या' अखेर सेन्सॉरमुक्त झाला आहे.
 
'टॉर्टुगा मोशन पिक्चर्स'ची निर्मिती असलेल्या या चित्रपटात एका सफाई कर्मचाऱ्यांची हृदयस्पर्शी कथा रेखाटण्यात आली आहे. जितेंद्र बर्डे यांनी या चित्रपटात अभिनय आणि दिग्दर्शनाची दुहेरी भूमिका निभावली आहे. लंडन येथील 'सोहोवाला कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा' या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये पहिल्यांदा 'प्रीमियर शो' करण्याचा मान ‘मोऱ्या’ या मराठी चित्रपटाने मिळवून, युरोपमधील प्रेक्षकांची हाऊसफुल्ल पसंती मिळविली आहे.
 
हे वाचलंत का? - 'सफाई कामगार ते सरपंच', ‘मोऱ्या’चा थक्क करणारा प्रवास येणार मोठ्या पडद्यावर!  
 
इतकेच नव्हे, तर मोऱ्या या मराठी चित्रपटाचा टीझर ‘कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' प्रदर्शित करण्यात आला होता. याशिवाय 'एलएचआयएफएफ बार्सिलोना, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 'खजुराहो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव', 'झारखंड आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव-२०२२', 'पेनझान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव', 'अयोध्या फिल्म फेस्टिव्हल', 'लेक सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल', 'बॉलिवूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' इत्यादी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय महोत्सवांत‘उत्कृष्ट चित्रपटा’चा बहुमान मिळविला मोऱ्या चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0