'इंडिया आघाडी'च्या सभेत मुख्यमंत्री पतीची तुलना थेट स्वातंत्र्यलढ्यातील सेनानींशी!

सुनीता केजरीवालांची दिल्लीत इंडिया आघाडीच्या सभेला उपस्थिती

    31-Mar-2024
Total Views |
Sunita Kejriwal INDIA Alliance Delhi


नवी दिल्ली :     विरोधी पक्षां (इंडिया आघाडी)च्या नेत्यांचा मेळावा नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला असून यावेळी विरोधी पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यादेखील उपस्थित होत्या. भाषणाला संबोधित करताना त्यांनी आपल्या पतीची तुलना थेट स्वातंत्र्यलढ्यातील सेनानींच्या बलिदानाशी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी ईडी कोठडीत असलेले मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्नी सुनीता यांच्याकडे तुरुंगातून संदेश पाठविला असून त्याचे वाचन यावेळी करण्यात आले आहे. त्या म्हणाल्या, मदर इंडिया आक्रोश करत असून भारत हा एक महान देश आहे ज्याची संस्कृती हजारो वर्षे जुनी आहे, सर्व काही देवाने दिलेले आहे, तरीही आपले लोक अशिक्षित आणि मागासलेले आहेत.

नवी दिल्ली येथे आयोजित इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या मेळाव्यास काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती, हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना, आरजेडीचे तेजस्वी यादव आणि सपाचे अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. महाराष्ट्रातून शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.