'बँक ऑफ इंडिया'अंतर्गत भरती सुरू, पदवीधर अर्ज करू शकतात, ४८ हजारांपर्यंत मिळेल पगार!

    31-Mar-2024
Total Views |
Bank of India Recruitment
 
 
मुंबई :   'बँक ऑफ इंडिया' अंतर्गत नवीन भरती केली जाणार आहे. पदवीधर तरुणांना बँक ऑफ इंडियात नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे. या भरतीद्वारे बँक ऑफ इंडियातील एकूण १५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरतीसंदर्भात शैक्षणिक पात्रता, पगार, वयोमर्यादा याबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
 
 
पदाचे नाव -
 
स्पेशालिस्ट सिक्युरिटी ऑफिसर (१५ जागा)
 
 
शैक्षणिक पात्रता -

मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातील पदवीधर

 
वयोमर्यादा -

२५ ते ३५ वर्षे


नोकरीचे ठिकाण -

मुंबई

 
अर्ज शुल्क -
 
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८५० रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता १७५ रुपये अर्ज शुल्क असेल.
 

सदर भरतीकरिता ऑनलाईन पध्दतीने भरावयाचा आहे
 
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ०३ एप्रिल २०२४ असेल.

 
जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा

'बँक ऑफ इंडिया'च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा

भरतीसंदर्भात नवनवीन अपडेट्स जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा