मोठी वहिनी आईसमान वाटते तर आई विरोधात उभे राहू नये!

भाजप आ. दरेकरांचा सुप्रिया सुळेंना सल्ला

    31-Mar-2024
Total Views |
BJP MLC Pravin Darekar


मुंबई : 
   मोठी वहिनी आईसमान वाटते तर आई विरोधात निवडणुकीत उभे राहू नये, असा सल्ला भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दिला आहे. तसेच महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करणारा नेता कोण हे जनतेला नीट माहित असल्याचा टोलाही दरेकरांनी सुळेंना लगावला आहे.

दरेकर म्हणाले की, सुप्रिया ताई महाराष्ट्रातील जनतेला नीट माहीत आहे की, फोडाफोडीचे राजकारण करणारा नेता या राज्यात कोण आहे. ज्याने या राज्यात अनेक घरं फोडली तो घरफोड्या या महाराष्ट्राला माहित आहे आणि जर तुम्हांला वहिनी आईसारख्या वाटतात तर सुप्रियाताई आपण आईच्या विरोधात उभे राहायला नको. आईला समर्थन दिले पाहिजे. पण एका ठिकाणी आई म्हणायचे आणि दुसरीकडे टीका करायची. भावनिक राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुप्रिया सुळे करत असल्याची टिकाही दरेकरांनी केली.
दरेकर पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणूका खरं म्हणजे देशाच्या विषयावर बोलायला पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कर्तुत्व आणि विकासकमे डोंगराएवढी आहेत. त्यांच्या कर्तुत्वला आव्हान देता येणार नाही आणि त्यामुळे कुटुंबाच्या गोष्टी करत असताना एकट्या अजित पवार यांच्या कुटुंबियांना पवार कुटुंबाने वाऱ्यावर सोडले आहे. याचे वाईट बारामतीच्या जनतेला वाटत आहे आणि त्याचे मतात प्रतिबिंब उठेल. बारामतीकर हे परिवार म्हणून अजित पवारांच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.


कोण डुबतंय, कोण सहारा घेतोय हे संपूर्ण देश पाहतोय

आ. दरेकर यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या विधानावरही शरसंधान साधले. ते म्हणाले की, आता कोण डुबतंय आणि कोण सहारा घेतोय हे देश पाहतोय. उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष डुबायला लागलाय आणि भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. जागतिक स्तरावरील नेते मोदी आहेत. त्यांना जर बुडते आणि काडीचा आधार बोलणार असतील तर यापेक्षा दुर्दैव काय? काडीचा आधार घ्यायचा म्हणून आज देशातील ५-५० नेते एकत्र येऊन एकमेकांना आधार द्यायचा केविलवाणा प्रयत्न करताहेत.