‘वास्तव’मधील देढ फुटिया कुणामुळे घडला? संजय नार्वेकरांनी सांगितले नाव...

Total Views |
संजय नार्वेकर यांची प्रमुख भूमिका असणारे सक्रिट हाऊस हे नाटक रंगभूमीवर पुन्हा एकदा आले असून या नाटकाचे दिग्दर्सन विजय केंकरे यांनी केले आहे.
 

vaastav  
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : महेश मांजरेकर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवलेला पहिला चित्रपट म्हणजे 'वास्तव' (Vaastav Movie) . याच चित्रपटामुळे अभिनेते संजय नार्वेकर (Vaastav Movie) यांनाही हिंदीत पहिला ब्रेक मिळाला तो देखील थेट अभिनेते संजय दत्त यांच्यासोबत. संजय नार्वेकर यांचे 'सक्रिट हाऊस' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आले असून या निमित्ताने महाएमटीबीशी गप्पा मारताना संजय नार्वेकर यांनी 'वास्तव' (Vaastav Movie) चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. संजय दत्त सारखा मित्र नाही असे म्हणत त्यांनी त्यांचे कौतुक देखील केले.
 
संजय नार्वेकर म्हणाले की, “ ‘वास्तव’ चित्रपटामुळे माझं आयुष्य बदललं. त्यानंतर माझा चित्रपटसृष्टीतला माझा वेगळा प्रवास सुरु झाला. ‘वास्तव’ चित्रपटाची गोष्ट ज्यावेळी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या डोक्यात सुरु होती. त्यावेळी त्यांनी माझं अंधातर नाटक पाहिलं असल्यामुळे वास्तव मधला देढ फुटिया मीच करावा हे त्यांच ठरलं होतं. पण चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हटलं की या पात्रासाठी मोठ्या कलाकाराला घेतलं पाहिजे, त्यानुसार तो कलाकार निवडला गेला. ज्यादिवशी लूक टेस्ट होतं तेव्हा मला महेश यांचा फोन आला आणि ते म्हणाले की लवकर मढला ये. कारण देढ फुटियासाठी ज्या कलाकाराची निवड झाली होती त्याने दाक्षिणात्य चित्रपटाला प्राधान्य देत तो तिथे वळला होता आणि संजय दत्त यांनी महेश यांना म्हटले की तुझा कुणीतरी मित्र तु या पात्रासाठी बोलला होतास त्याला बोलवं. आणि मी जाऊन तो लूक टेस्ट दिला आणि संजय दत्त, महेश मांजरेकर यांच्यामुळे वास्तवमधला देढ फुटिया घडला”.
 
पुढे ते संजय दत्तबद्दल बोलताना म्हणाले की, संजय दत्त सारखा मित्र नाही. त्याने जर का कुणाशी मैत्री केली तर पुर्णपणे निभावणार पण त्याला ती व्यक्ती पटली नाही तर तो वळूनही त्याच्याकडे पाहणार नाही. वास्तवचे शुट करत असताना कधीच असं झालं नाही की संजय दत्त यांना मी त्यांच्यावरचढ अभिनय करत आहे. उलट बऱ्याचदा तेच म्हणायचे हा संवाद संज्याला करु दे, मी बाजूला थांबतो”, अशा अनेक आठवणी संजय नार्वेकर यांनी वास्तव चित्रपटाबद्दल सांगितल्या.
 
१९९९ साली प्रदर्शित झालेल्या वास्तव: द रिअ‍ॅलिटी या चित्रपटात संजय दत्त, नम्रता शिरोडकर संजय नार्वेकर मोहनीश बहल, परेश रावल, रीमा लागू, शिवाजी साटम यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.