पीएफआयच्या ३ दहशतवाद्यांना ईडीकडून अटक!

    30-Mar-2024
Total Views |
3-pfi-terrorist-arrested-by-ed-in-money-laundering


नवी दिल्ली : 
   बंदी घालण्यात आलेली इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(पीएफआय) च्या तीन दहशतवाद्यांना सक्तवसुली संचालनालय(ईडी)कडून अटक करण्यात आली आहे. पीएफआयकडून दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र प्रशिक्षण देण्यात येत होते. याकरिता संघटनेकडून पैसेही घेण्यात येत असत. आता ईडीकडून सदर पीएफआय दहशतवाद्यांना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे.




दरम्यान, ईडीकडून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची अब्दुल खादर पुत्तूर, अन्शाद बद्रुद्दीन आणि फिरोज अशी नावे आहेत. हे तिघेही पीएफआयसाठी फिजिकल ट्रेनर म्हणून काम करत होते, असा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. तीनही दहशतवाद्यांना अटकेनंतर दि. ३० मार्च रोजी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.


पीएफआय या इस्लामिक संघटनेवर दहशतवादी कारवायांशी कथित संबंध असल्याच्या कारणास्तव (युएपीए) तरतुदींनुसार सप्टेंबर २०२२ मध्ये केंद्राने पीएफआयवर बंदी घातली होती. तेव्हापासून तपास यंत्रणा त्यांच्यावर बेकायदेशीर कृत्याबाबत कारवाई करत आहेत. तसेच, डिसेंबर २०२३ मध्ये पीएफआयच्या ५ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती.

त्यानंतर आता ईडीकडून पुन्हा एकदा पीएफआयवर कारवाई करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग अंतर्गत तीन दहशतवाद्यांना पीएफआयकडून अटक करण्यात आली आहे. शस्त्रास्त्र प्रशिक्षण देण्याचा आणि या कामासाठी प्रतिबंधित संघटनांकडून पैसे मिळवल्याचा आरोप असल्याचे ईडीकडून न्यायालयाला सांगण्यात आले आहे.