अन्सारीच्या दफनविधी दरम्यान वाद; भाऊ अफजल म्हणाला, परवानगीची गरज नाही!

    30-Mar-2024
Total Views |
dm-and-afzal-ansari-strong-debate-last-rite



नवी दिल्ली :     उत्तर प्रदेशातील माफिया तथा कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचा बांदा येथील तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर अन्सारीला रुग्णालयात दाखल करण्यात होते परंतु, त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, आज सकाळी १० वाजता अन्सारीच्या मृतदेहास दफन करण्यात आले. यावेळी मोठा जमाव जमल्याचे पाहायला मिळाला. जमावाकडून अनेक घोषणाबाजी करण्यात आली.
 

 
दरम्यान, मृतदेहास दफन करताना गाझीपूरचे डीएम आणि अन्सारीचा भाऊ अफजल अन्सारी यांच्यात जोरदार बाचावाची झाली. त्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून गाझीपूरचे डीएम म्हणाले की कलम १४४ लागू असतानाही ज्या प्रकारची कृती केली गेली आहे त्यावर कारवाई केली जाईल. गाझीपूर डीएम म्हणाले की, सर्व काही व्हिडिओग्राफीमध्ये कैद झाले आहे.
विशेष म्हणजे अन्सारीच्या दफनविधीस सपा नेत्यांसह अनेकांनी मोठी गर्दी केली होती. ज्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनास कलम १४४ लागू करावा लागला. गाझीपूर डीएम व अफजल अन्सारी यांच्या जोरदार वाद झाला. अफजल अन्सारी म्हणाला की, दफनविधीसाठी परवानगीची गरज नाही. यावर डीएम यांनी याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.
 
दरम्यान, माफिया मुख्तार अन्सारीला कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत गाझीपूर जिल्ह्यातील युसूफपूर मोहम्मदाबाद येथील त्याच्या वडिलोपार्जित घरातील कालीबाग कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आले. अन्सारीच्या दफनविधीला मोठा जमाव जमला यावेळी अनेकांनी घोषणाबाजी केली, त्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.