प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीकडून ९ उमेदवारांची घोषणा

    30-Mar-2024
Total Views |
OBC Bahujan Party Prakash Shendge
 

मुंबई :    ओबीसी बहुजन पार्टीने लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून, ९ उमेदवारांच्या नावांची घोषणा शुक्रवार, दि. २९ मार्च रोजी केली. अकोल्यातून प्रकाश आंबेडकर आणि कोल्हापुरातून शाहु महाराजांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

याविषयी माहिती देताना ओबीसी बहुजन पार्टीचे प्रकाश शेंडगे म्हणाले, आज आमच्या सुकाणू समितीची बैठक झाली. त्यात ९ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडी करण्यासाठी आमची चर्चा सुरू आहे.
 
 


मी स्वत: सांगलीची निवडणूक लढवली तर प्रकाश आंबेडकर पाठिंबा देणार आहेत. दरम्यान, हातकणंगलेमध्ये सध्या दोन उमेदवारांचे नावे निश्चिच केली आहेत. सोमवारी त्यातील एकाचे नाव अंतिम करू, असेही त्यांनी सांगितले.


ओबीसी बहुजन पार्टीचे मतदारसंघनिहाय ९ उमेदवार पुढीलप्रमाणे :-


१) सांगली - प्रकाश शेंडगे

२) नांदेड - ॲड. अविनाश भोशीकर
 
३) परभणी - हरीभाऊ शेळके

४) हिंगोली - ॲड. रवी शिंदे

५) यवतमाळ वाशिम - प्रशांत बोडखे

६) बारामती - महेश भागवत

७) बुलढाणा - नंदू लवंगे

८) शिर्डी - अशोक अल्लाड

९) हातकणंगले - मनिषा डांगे किंवा प्रा. संतोष कोळेकर