सांगलीत हिंदू कुटुंबावर धर्मांधांचा हल्ला! म्हणाले, 'तुमच्या स्त्रियांवर बलात्कार...'

    29-Mar-2024
Total Views |

Sangli News

सांगली :
पाकिजा मशिद परिसरातील धर्मांधांनी येथील हिंदू परिवारावर (Sangali Hindu News) हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादावरून तणाव निर्माण झाल्याने प्रमुख आरोपी रफिक मुल्लाच्या नेतृत्वात धर्मांधांनी कुदळे कुटुंबावर हल्ला केला. एका वृत्तानुसार, त्यांनी हिंदू परिवाराच्या पुरुषांना जिवे मारण्याची तर स्त्रियांवर बलात्कार करण्याची धमकी देत पाकिजा मशिदीजवळील त्यांचे वडिलोपार्जित घर सोडण्यास भाग पाडल्याचेही कळत आहे. धर्मांधांकडून होणाऱ्या सततच्या छळवणूक आणि अत्याचाराबाबत कुदळे कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

हे वाचलंत का? : चाकूचा धाक दाखवून म्हणायला लावले, 'अल्लाह-हू-अकबर'

धर्मांधांकडून जाणीवपूर्वक होणाऱ्या छळाला कंटाळून तक्रारदाराने आपल्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी कंपाउंड वॉल बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र, १७ मार्च रोजी संबंधित बांधकाम सुरू केल्यावर आरोपी आणि त्याच्या ३०-४० मुस्लिम साथीदारांनी हिंदू कुटुंबावर जोरदार हल्ला चढवला. मुस्लिम जमावाने लोखंडी रॉड, काठ्या आणि दगडांचा वापर करत हिंदू कुटुंबावर हल्ला केल्याचे स्पष्ट होत आहे.

कुदळे कुटुंबाला घेराव घालणाऱ्या रफिक मुल्ला व त्याचे साथीदार सलीम मुल्ला, यासीन मुल्ला, सय्यद मुल्ला, समीर मुल्ला, सय्यदा मुल्ला, हीना आणि शर्मीन मुल्ला यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम १४३, १४७, १४८, ३०७, १४९, ३३७, ५०४, ५०६ गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

हे वाटलंत का? : साताऱ्यातून शरद पवार यांनी लढावे, कार्यकर्त्यांची मागणी!

मिळालेल्या माहितीनुसार दोघांना अटक करण्यात आली असून उर्वरित संशयितांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक हिंदू कार्यकर्त्यांनी याचा निषेध करत न्यायाची मागणी केली आहे. त्यांनी पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले असून निष्पक्ष तपास करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.