साताऱ्यातून शरद पवार यांनी लढावे, कार्यकर्त्यांची मागणी!

    29-Mar-2024
Total Views |
Satara Sharad Pawar


मुंबई : 
   सातारा लोकसभा निवडणुकीकरिता विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीस नकार दिला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार यांच्याकडून सातारा दौऱ्यात पक्षाचे स्थानिक पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आहे. यावेळी शरद पवारांनी सातारा लोकसभा जागेकरिता कुणाला उमेदवारी द्यावी, याबाबत पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करत मतं जाणून घेतली आहेत.

दरम्यान, सातारा दौऱ्यात शरद पवारांनी चर्चा करत श्रीनिवास पाटील यांच्याजागी कुणाला संधी देण्यात यावी, यावर चर्चा केली आहे. श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीचे कारण देत निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. शरद पवार म्हणाले, पाटील निवडणूक लढणार नसले तरी ते स्वतःकडून शक्य होईल तितकी मदत पक्षाला करणार असल्याचे पवारांनी सांगितले.


हे वाचलंत का? - शरद पवारांच्या शिलेदाराचा निवडणूक लढण्यास नकार


पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या साताऱ्यातील बैठकीत शरद पवारांना येथून निवडणूक लढवावी असेदेखील सुचविण्यात आले आहे. पवार म्हणाले, स्थानिक कार्यकर्त्यांनी साताऱ्यातून निवडणूक लढावी, असेदेखील सांगितले आहे, तसेच, साताऱ्यातून लढण्यास अनेकजण इच्छुक आहेत. सातारा लोकसभा उमेदवारीबाबत येत्या २-३ दिवसांत निर्णय घेऊ, असेही शरद पवार यांनी सांगितले.

सातारा लोकसभा मतदारसंघाकरिता शरद पवार गटाकडून दोन नावे चर्चेत आहेत. यात शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांची नावे चर्चेत आहेत. साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली असून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल. तसेच, ज्या सूचना तुम्ही केल्या आहेत त्यावर सकारात्मक चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, असेही शरद पवार यांनी सांगितले.