दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

    29-Mar-2024
Total Views |

tiger


मुंबई (विशेष प्रतिनिधी): भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील लेंडेझरी येथे वनकर्मचाऱ्यांना एक वाघ (tiger) मृतावस्थेत आढळला. बुधवार दि. २७ मार्च रोजी वाघाचे मृतशरीर (tiger) आढळले असून दोन वाघांच्या झुंजीमध्ये या वाघाचा मृत्यू (tiger) झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संध्याकाळी ५:४५ च्या सुमारास वन कर्मचाऱ्यांना हा मृतदेह आढळला.

लेंडेझरीच्या राखीव वन क्षेत्रातील लेंडेझरी-विटपूर रस्त्याच्या बाजूला १० मीटर अंतरावर झुडपामध्ये वाघाचा (tiger) मृतदेह आढळला. मृत वाघ (tiger) नर जातीचा असून त्याचे वय साधारण ४ ते ५ वर्ष आहे. प्राथमिक तपासणीमध्ये दोन वाघांच्या (tiger) झुंजीमध्ये हा मृत्यू झाल्याची शक्यता असली तरी शव विच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.
या प्रकरणी प्रादेशिक उपवनसंरक्षक राहूल गवई, गडेगाव आगाराचे साकेत शेंडे, मानद वन्यजीव रक्षक शहीद खान तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. बारापात्रे आणि वनकर्मचारी उपस्थीत होते. वाघाच्या शवविच्छेदनानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) नियमांनुसार अंत्यसंस्कार केले गेले.