शेअर बाजार विश्लेषण: आज बाजारात पुन्हा मोठी रॅली सेन्सेक्स ६१६.३३ व निफ्टी १८९. ४० अंशाने उसळला

मिडिया वगळता क्षेत्रीय निर्देशांकात मोठी वाढ, भारतीय बाजारावर गुंतवणूकदारांचा विश्वास कायम

    28-Mar-2024
Total Views |

Stock Market
 
मोहित सोमण
 
मुंबई: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात कालप्रमाणेच आजही वाढ कायम राहिली आहे. शेअर बाजारात आज एनएससी (NSE) व बीएससी (BSE) या निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. आजही परदेशी व देशांतर्गत गुंतवणूकदारांचा कल भारतीय बाजारात सकारात्मक राहिला आहे. एस अँड पी सेन्सेक्स बँक निर्देशांकात आज ६१६.३३ अंशाने वाढत ७३५७८.८९ पातळीवर पोहोचला असून निफ्टी ५० निर्देशांक १८९. ४० अंशाने वाढत २२३१३.०५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्समध्ये आज ०.७३ टक्क्याने तर एनएससी निफ्टीमध्ये ०.८६ टक्क्याने वाढ झाली आहे.
 
सेन्सेक्स बँक निर्देशांकात ४०२.९८ अंशाने वाढ होत ५३४८२.३८ पातळीवर पोहोचले आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ३५६.७५ अंशाने वाढत ४७१४२.७० पातळीवर पोहोचला आहे.आज सेन्सेक्समधील सगळे निर्देशांक सकारात्मक राहिले असून निफ्टीमध्येही हा ट्रेंड कायम राहिला आहे. बँक सेन्सेक्समध्ये आज ०.७६ टक्क्याने वाढ झाली आहे तर बँक निफ्टीत ०.७२ टक्क्याने वाढ झाली आहे.
 
बीएससी मिडकॅपमध्ये आज ०.६२ टक्क्याने व स्मॉलकॅपमध्ये ०.३३ टक्क्याने वाढ झाली आहे. एनएससीवर मिडकॅपमध्ये ०.४९ टक्क्याने व स्मॉलकॅपमध्ये ०.६८ टक्क्याने वाढ झाली आहे.
 
निफ्टी सेक्टोरल इंडायसेसमध्ये (क्षेत्रीय निर्देशांकात) देखील हिरवा कंदील कायम राहिला असुन या निर्दशांकात आज मोठी वाढ झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक वाढ निफ्टी पीएययु बँक (पब्लिक सेक्टर युनिट) बँकांत २.६२ टक्क्याने झाली असून त्यानंतर निफ्टी ऑटो (१.२९ %) निफ्टी मेटल (१.२५ %) फार्मा (१.२१ %) खाजगी बँका ०.३५ %) आयटी (०.४४ %) फायनांशियल सर्विसेस (०.९७ %) रियल्टी (०.५५ %) हेल्थकेअर (१.३९ %) कनज्यूमर ड्युरेबल्स (०.८३ %) तेल गॅस (०.६६ ) या समभागात चांगली वाढ झालेली आहे. आज गुंतवणूकदारांना नुकसान मिडिया (०.७० %) निर्देशांकात झाले आहे.
 
सकाळच्या सत्रात निफ्टी २२१६३ ला उघडला व अखेरच्या सत्रात बंद होताना २२३२६ पर्यंत थांबला . दिवसातील निफ्टी 'लो ' आणि खुला होण्याची पातळी २२१६३ असल्याने आज बाजारात चांगले संकेत दिसून आले आहेत.सेन्सेक्स मध्येही फार चढ उतार पहायला मिळाले नाहीत. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स २३२६९ ला उघडला असून दिवसांच्या शेवटी २३४४०.८० पर्यंत बंद झाला आहे. बाजारातील समभागांनी आज आपली आघाडी कायम राखली आहे.
 
आज विशेषत ब्लू चीप कंपनीचे शेअर्स मुख्य प्रवाहात तेजीत राहिले आहेत. याशिवाय काल मॉर्गन स्टॅनलीने भारतीय जीडीपीबददल केलेले सकारात्मक भाकीत पाहता भारताचा जीडीपी दर आर्थिक वर्ष २४-२५ मध्ये ६.८ टक्क्याने वाढण्याची शक्यता कंपनीने म्हटल्याने आज बाजारात गुंतवणूकदारांचा विश्वास वृद्धींगत झाल्याचे चित्र पहायला मिळाले.याशिवाय फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपात करण्याचे कोणतेही चिन्हे दिसत नसल्याने आज अनेक समभागांची रॅली आज पहायला मिळाली आहे.
 
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (Foreign Institutional Investors ) ने आज आपली गुंतवणूक कायम राखत भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपला विश्वास दाखवल्याने आज इक्विटी बेंचमार्क मोठ्या स्तरावर पोहोचला आहे.परदेशी गुंतवणूकदारांनी आज २१७० कोटींची गुंतवणूक करून देशांतर्गत गुंतवणूकदारांनी सुमारे ११९७ कोटींची गुंतवणूक केल्याने आज मोठा फायदा शेअर बाजारात दिसून आला आहे.याशिवाय परकीय शेअर बाजारात मार्केट कॅपिटलायझेशन (बाजारी भांडवलात) वाढ झाल्याने आज भारतातील कंपनीच्या समभागात चांगली वाढ झाली आहे.
 
अमेरिकेतील तिन्ही शेअर बाजारात मोठी रॅली पहायला मिळाली आहे. अमेरिकेतील DOW, S & P 500, NASDAQ हे तीनही शेअर बाजार वधारले असुन युरोपीय बाजारातील FTSE, DAX, CAC 40 याही तीनही बाजारातील निर्देशांकात वाढ पहायला मिळाली आहे. आशियाई बाजारात NIKKEI वगळता HANG SENG व SHANGHAI बाजारात वाढ झाली आहे.
 
सकाळी क्रूड तेलाच्या किमंती घटल्याचे चित्र पहायला मिळाले मात्र क्रूड तेलाच्या व गॅसोलिनची नवीन आकडेवारीयेताच पुन्हा क्रूड तेलाच्या भावात वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून क्रूड तेलाच्या किंमतीत वाढ झाली होती. वाढलेली मागणी व घटलेल्या पुरवठ्यामुळे क्रूड महागले होते. परंतु नवीन क्रूड तेलाच्या डेटा नुसार युएस मध्ये क्रूड तेलाच्या आयातीत वाढ झाल्याने पुन्हा तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. संध्याकाळपर्यंत एमसीएक्स क्रूड निर्देशांकात ०.७८ टक्क्याने वाढ झाल्याने प्रति बॅरेव किंमत ६८२९ रूपये झाली होती.तर ब्रेंट क्रूड तेलाच्या निर्देशांकात प्रति डॉलर ०.५७ टक्क्याने वाढत ८५.९० डॉलर प्रति बॅरेलपर्यंत किंमत पोहोचली तर WTI निर्देशांकात ०.९० टक्क्याने वाढ होत प्रति डॉलर क्रूड निर्देशांक ८२.१० पर्यंत गेला होता.
 
सकाळी महागाई व जीडीपी दर कपात होणार नाही या आशेने वातावरण निर्मिती होत डॉलर महागला होता. महागाई दराचा अनपेक्षित आकडा पाहत फेडरल रिझर्व्ह व्याज दरात कपात करण्याचे पुढे ढकलले गेले आहे. शेवटी रुपया डॉलरच्या तुलनेत प्रति डॉलर ८३.३८ रुपयांवर स्थिरावला आहे.
 
अखेरच्या सत्रानंतर बीएससीवरील कंपन्यांचे बाजारी भांडवल (मार्केट कॅपिटलायझेशन) हे ३८३.६४ लाख कोटी इतके असून एनएससीवरील कंपन्यांचे बाजारी भांडवल ३८०.५३ कोटी रुपये इतके राहिले आहे. आज बाजारात महत्वाचे ठरणारे टी + ० सेटलमेंटला सुरूवात झाली आहे. कोटक बँकेने सोनाटा फायनान्सचे आज अधिग्रहण केले. आज बजाज फायनान्ससारखे महत्वाचे समभाग १ ते २ टक्क्याने वाढल्याने निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. असट्रा मायक्रोव्हेव प्रोडक्ट ( Astra Microwave Product) चे समभाग भारत इलेक्ट्रोनिक लिमिटेडकडून मिळालेल्या नवीन ३८६ कोटींच्या ऑर्डरमुळे आज १४ टक्क्यांनी कंपनीचे शेअर्स वधारले आहेत.
 
बीएससीवर बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, एम अँड एम, एसबीआय,नेसले इंडिया,पॉवर ग्रीड, विप्रो, एनटीपीसी, इंडसइंड बँक, टायटन कंपनी या समभागात गुंतवणूकदारांना फायदा झाला असून रिलायन्स, एक्सिस बँक, एचसीएल, टेक महिंद्रा, आयटीसी या समभागात आज गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागले आहे.
 
एनएससीवर ग्रासीम, बजाज फिनसर्व्ह, हिरो मोटोकॉर्प, पॉवर ग्रीड, आयशर मोटर्स, अदानी एंटरप्राईज, टाटा स्टील, डिवीज, टाटा स्टील, नेसले इंडिया, ओएनजीसी, सिप्ला एम अँड एम, एनटीपीसी, टाका मोटर्स, विप्रो या समभागावर फायदा झाला असून एक्सिस बँक, बजाज ऑटो, टेक एम , रिलायन्स, श्रीराम फायनान्स, ब्रिटानिया, एचसीएलटेक या समभागात मात्र गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागले आहे.
 
आज एकूण दिवसभरात बीएससीवर ३९३८ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना १८०२ समभागात गुंतवणूकदारांना फायदा झाला असून २२०४ कंपनीच्या समभागाचे मूल्यांकन घसरले आहे. यातील १३ कंपन्यांचे समभाग अप्पर सर्किटवर पोहोचले असून ९ कंपन्यांचे समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत. एनएससीवर दिवसात २७११ समभागाचे ट्रेडिंग झाले असून यातील १४१७ समभागांचे मूल्यांकन वाढले तर ११९६ कंपनीच्या समभागातील मूल्यांकनात घट झाली आहे. यातील १३२ समभाग अप्पर सर्किटवर पोहोचले असून ११३ कंपनीचे समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
आजच्या शेअर बाजारातील परिस्थितीविषयी मुंबई तरूण भारतशी बोलताना रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे एसव्हीपी अजित मिश्रा म्हणाले, ' बाजाराने वाढीव नफा वाढवला आणि अनुकूल संकेतांचा मागोवा घेत रेकॉर्ड उच्च पातळीवर जवळजवळ पुन्हा चाचणी घेतली. सुरुवातीच्या चढ-उतारानंतर, निफ्टीने बहुतांश सत्रात ताकदीकडे वळले, परंतु शेवटच्या तासात तीक्ष्ण घट झाल्याने फायदा कमी झाला.अखेरीस, तो २२३२६.९० स्तरावर (०.९२%) वर स्थिरावला व सर्व प्रमुख क्षेत्रांनी या वाटचालीला हातभार लावला ज्यामध्ये मेटल, फार्मा आणि ऑटो हे आघाडीवर होते. दरम्यान, व्यापक निर्देशांकांनी संमिश्र व्यवहार केले परंतु ते हिरव्या रंगात संपले.
 
अलीकडील हालचाली टोनमध्ये बदल दर्शविते परंतु विक्रमी उच्च पातळीवर नफा घेणे उच्च स्तरावर सावधगिरी दर्शवते. आम्हाला वाटते की निफ्टी आणि बँकिंग क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांमधील संरेखन पुढील दिशात्मक वाटचाल निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. याशिवाय, जागतिक संकेत, विशेषत: यूएस बाजारांवरही लक्ष केंद्रित केले जाईल. सर्वांमध्ये, आम्ही निर्देशांक प्रमुख आणि मोठ्या मिडकॅप्सना प्राधान्य देऊन स्टॉक निवडीवर लक्ष केंद्रित करणे सुरू ठेवण्याचा सल्ला देतो.'
 
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी मुंबई तरूण भारतला प्रतिक्रिया देताना बोनझा पोर्टफोलिओ लिमिटेडचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले की, ' आज निफ्टी ०.९२% ने २२३२६ वर सकारात्मक नोटवर बंद झाला तर सेन्सेक्स ०.९० % ने ७३६५१ वर बंद झाला. निफ्टी पीएसयू बँक आणि ऑटो हे क्षेत्र होते ज्यांनी आज अनुक्रमे २.६२ % आणि १.२९ % ने वाढ केली आहे.
 
फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर क्रिस्टोफर वॉलर यांनी व्याजदर कपातीबाबत केलेल्या टिप्पणीवर गुंतवणूकदारांनी प्रक्रिया केल्याने आणि धोरणाबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी अमेरिकेच्या आर्थिक डेटाची वाट पाहिल्याने आज सोन्याचे भाव स्थिर राहिले. देशाच्या थर्मल पॉवर प्लांटना कोल इंडिया लिमिटेड (CIL) कडून एकूण ६१०.८ दशलक्ष टन (MTs) कोळसा पुरवठा झाला, जो या क्षेत्राच्या वार्षिक ६१० MTs च्या उद्दिष्टापेक्षा जास्त आहे.
 
फर्मने हा टप्पा आर्थिक वर्ष २०२४ च्या शेवटच्या शेड्यूलच्या चार दिवस आधी पूर्ण केला, ज्यामुळे तो आजपर्यंतचा सर्वोच्च आहे. बजाज फिनसर्व्ह, हीरो मोटोकॉर्प, ग्रासिम इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स आणि आयशर मोटर्स हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले, तर श्रीराम फायनान्स, टेक महिंद्रा, ॲक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आणि एचसीएल टेक्नॉलॉजीस सर्वाधिक नुकसान झाले.'