मोदींना 'अँटी मुस्लिम' म्हणणं हा २१व्या शतकातील मोठा विनोद!

तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांचे एएनआय पॉडकास्टमध्ये भाष्य

    28-Mar-2024
Total Views |
ANI Podcast K Annamalai



नवी दिल्ली :     तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांनी एएनआय पॉडकास्टमध्ये हिंदुत्वावर भाष्य केले आहे. कर्नाटक पोलीस दलात आयपीएस अधिकारी म्हणून के अण्णामलाई यांनी एक काळ गाजवला आहे. यादरम्यान, आपण रमजान काळात अनेक मुस्लिम बांधवांना भेटलो आहे. त्याचा उल्लेख करत त्यांनी मुस्लिम कट्टरतावादावर भाष्य केले आहे. मी स्वतः कुराण वाचले असून आपण एकमेकांच्या धर्माचा आदर करायला हवा. तसेच, हिंदू-मुस्लिम बांधव एक असून आपल्याला एकमेकांच्या धर्माविषयी कुतूहल असले पाहिजे, असेही त्यांनी पॉडकास्टद्वारे म्हटले आहे.


हे वाचलंत का? - 'महुआ इफेक्ट' ४ वेळा खासदार राहिलेल्या पिनाकी मिश्रांचे बीजेडीने तिकीट कापले!


दरम्यान, इतर धर्मांतील संस्कृती तसेच विविधता आपल्याकडे दिसून येते त्याचा आदर करणे, त्याचा स्वीकार करणे हेच खरे हिंदुत्व आहे, असे के अण्णामलाई म्हणाले. मी वर्षाचे ३६५ दिवस माझ्या धर्मासोबतच इतरांच्या धर्माचा सुध्दा आदर करतो यातच परस्पर आदरभाव आहे. एकेकाळी कोईम्बतूरमध्ये कट्टरतावादाला खतपाणी घातले जायचे. परंतु, आता संपूर्ण तामिळनाडूमध्ये कट्टरतावाद कमी होण्यास मदत मिळत आहे याचे कारण सर्व धर्मांचा आदर करणे हेच आहे. विशेष म्हणजे तामिळनाडू प्रदेश भाजपकडून गेल्या तीन वर्षांपासून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. याचे महत्त्वाचे कारण आमच्या पक्षात असंख्य मुस्लिम कार्यकर्ते आहेत, असेही के अण्णामलाई यांनी बोलताना स्पष्ट केले.

के. अण्णामलाईंनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला असून ते म्हणाले, तुम्ही जनतेला आश्वासने देऊन सत्तेत आल्यानंतर त्याची पूर्तता करणे गरजेचे आहे. परंतु, कर्नाटक सरकार केंद्र सरकारकडे आर्थिक मदत मागत आहे. ते म्हणाले, तुम्हाला सरकार चालवायचे त्यासाठी तुम्ही नवीन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करा. कर्नाटक हे उत्तम राज्य असून नवीन उत्पन्न निर्माण करून तुम्ही सरकार चालविले पाहिजे, असेही के अण्णामलाई यांनी एएनआय पॉडकास्टमध्ये म्हटले आहे. एएनआय पॉडकास्टच्या माध्यमातून तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना अँटी मुस्लिम म्हणणे २१ व्या शतकातील महामुर्खपणा आहे.