'महुआ इफेक्ट' : ४ वेळा खासदार राहिलेल्या पिनाकी मिश्रांचे बीजेडीने तिकीट कापले!

    28-Mar-2024
Total Views |
Mahua Moitra effect BJD drop Mishraनवी दिल्ली :      पुरीमध्ये भाजपकडून संबित पात्रा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता स्थानिक पक्ष बीजेडीकडून नवा उमेदवार त्यांच्याविरोधात देण्यात आला आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पात्रा यांच्याविरोधात अरुप पटनायक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे ४ वेळा खासदार राहिलेल्या पिनाकी मिश्रा यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

दरम्यान, विद्यमान खासदार पिनाकी मिश्रा हे पेशाने वकील आहेत. त्यांनी टीएमसी खा. महुआ मोइत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी झाल्यानंतर व बंगला रिकामा करण्याची नोटीस मिळाल्यानंतर सरकारी बंगल्यात राहू द्या, असे आवाहन करून न्यायालयात बाजू मिश्रांनी मांडली होती.
 

हे वाचलंत का? - माझं शरीर तुरुंगात आहे! आत्मा जनतेसोबत आहे, केजरीवालांचा संदेश


बीजेडी प्रमुख नवीन पटनायक यांनी आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ९ तर दुसऱ्या यादीत ६ जणांचा समावेश करण्यात आलेला आहे. बीजेडीकडून एकाच दिवशी उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

बीजेडीकडून पहिल्या यादीत कालाहंडीसाठी लंबोदर नियाल, संबलपूरसाठी प्रणव प्रकाश दास, सुंदरगढसाठी दिलीप तिर्की, मयूरभंजसाठी सुदाम मार्डी, केंद्रपारा येथील अंशुमन मोहंती, नबरंगपूरसाठी प्रदिप कुमार माझी, भुवनेश्वरसाठी मन्मथ रौत्रे, कौसल्या कोसल्या आणि कोसल्या हिकाजी यांची नावे आहेत. आस्कासाठी साहू जाहीर करण्यात आले.

तर दुस-या यादीसाठी पुरीसाठी अरुप पटनायक, जयपूरसाठी शर्मिष्ठा सेठी, जगथसिघपूरसाठी राजश्री मल्लिक, ढेंकनालसाठी अविनाश सामल, कंधमालसाठी अच्युतननदा सामंत आणि कटकसाठी संतरूप मिश्रा यांची नावे आहेत. ४ वेळा खासदार राहिलेल्या पिनाकी मिश्रा यांना आगामी निवडणुकीत डावलण्यात आले आहे.