नेपाळमार्गे भारतात घुसण्याचा प्रयत्न फसला, २ चीनी नागरिकांना अटक!

    27-Mar-2024
Total Views |
two-chinese-nationals-arrested-for-illegallyनवी दिल्ली :    सशस्त्र सीमा बल(एसएसबी) व पोलिसांनी उत्तर प्रदेशातील सिध्दार्थनगर जिल्ह्यात नेपाळ सीमेनजीक २ चीनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, नेपाळमधून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न एसएसबी व पोलिसांनी सदर प्रयत्न हाणून पाडला आहे. या कारवाईत एका महिलेसह २ चीनी नागरिकांना पकडले असून मोबाईल, सिम व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

दरम्यान, हे प्रकरण सिद्धार्थनगरमधील मोहना पोलीस स्टेशन परिसरातील असून गुन्हेगारांविरुद्धच्या मोहिमेचा एक भाग म्हणून पथक गस्त घालत असताना हे यश मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पकडण्यात आलेले दोघेही अवैधरित्या भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. अटक करण्यात आलेल्या चिनी नागरिकांमध्ये एक महिला आणि दुसरा पुरुष आहे. या दोघांकडून चायनीज आणि नेपाळी सिम व्यतिरिक्त अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.


हे वाचलंत का? - दिल्ली मद्य घोटाळा : आपच्या 'या' नेत्याच्या घरावर ईडीची छापेमारी!


या अटकेनंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी कारागृहात केली आहे. तसेच, या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून सदर अटक दि. २६ मार्च रोजी करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हे प्रकरण सिद्धार्थनगरमधील मोहना पोलीस स्टेशन परिसरात गुन्हेगारांविरुद्धच्या मोहिमेचा एक भाग म्हणून पथकाकडून गस्त घालत होते, असे पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, या गस्तीमध्ये निमलष्करी एसएसबीच्या जवानांचाही समावेश होता. तेवढ्यात एका महिलेसह दोन संशयित व्यक्ती भबानी तिराहा येथून नेपाळमार्गे भारतीय हद्दीत प्रवेश करताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता त्या व्यक्तीचे नाव ZHOU PULIN आणि महिलेचे नाव YUAN YUHAN होते. झोउ पुलिन हे चीनच्या सिचुआन प्रांताचे रहिवासी आहेत तर युआन युहान हे झोंगकिंग जिल्ह्याचे रहिवासी आहेत, असे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे.