शुक्रवारच्या नमाजनंतर मशिदींमध्ये सेक्स पार्टीज, एक्स मुस्लिम पीडिताचे योगी आदित्यनाथ यांना पत्र!

    27-Mar-2024
Total Views |
ex-muslim-girl-alleges-supplying-girlsनवी दिल्ली :     उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात मौलाना व हाजीसह एकूण ८ जणांविरुध्द सामूहिक बलात्काराचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मशिदीतील अत्याचारानंतर इस्लाम सोडलेल्या तरुणीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

दरम्यान, प्रत्येक शुक्रवारच्या नमाजानंतर मुलींच्या सेक्स पार्ट्या होत असून पीडितेने एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पीडिता आणि तिची आईसोबत घडलेल्या घटनेची माहिती देत आहे. यातील काही व्हिडीओ मशिदीच्या आतीलही आहेत. या व्हिडीओत इमामच्या पलंगावर अनेक शस्त्रे आणि काडतुसे पडलेली दिसत असून बेडवर काही अश्लील पुस्तकेही विखुरलेली आहेत.


हे वाचलंत का? - ७० हजार सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार! 'हे' आहे कारण'


दि. २१ मार्च २०२४ रोजी उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात सामूहिक बलात्काराचा प्रकार उघडकीस आला असून वर्षभरापूर्वी हिंदू धर्मात परतलेल्या पीडितेने बलात्कार करणाऱ्यांपैकी चार जण तिचे मामा असल्याचा आरोप केला आहे. या पीडितेचे आणखी एक पत्र समोर आले असून यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मशिदीमध्ये होत असलेल्या बेकायदेशीर हालचालींबाबत तक्रार केली आहे.

सदर पत्र १२ मार्च २०२४ रोजी लिहिले असून ज्यामध्ये मशिदीमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर मुलींवर बलात्कार केल्यासारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील शहजाद नगर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या पीडितेने रामपूर शहरातील बेगम बाग भागात बनत असलेल्या मशिदीविरोधात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.