७० हजार सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार! 'हे' आहे कारण'

    27-Mar-2024
Total Views |
argentinas-president-javier-milei


नवी दिल्ली :     अर्जेंटिना राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची योजना आखली आहे. अर्जेंटिनामधील तब्बल ७० हजार सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात येणार आहे. राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले यांनी राज्याचा आकार कमी करण्यासाठी "चेनसॉ-स्टाईल" दृष्टिकोन दर्शविला आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांतून समोर आली आहे.


 
दरम्यान, अर्जेंटिनामध्ये सरकारी नोकरीतून ७० हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार असून येथील सरकारने बिकट आर्थिक परिस्थितीचे कारण देत हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, दि. २६ मार्च रोजी झालेल्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्राध्यक्ष मिले यांनी सार्वजनिक कामे थांबवण्याचा, प्रांतीय सरकारांना निधी कमी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.


हे वाचलंत का? - जर्मनीनंतर आता अमेरिकेने उचलली केजरीवालांची तळी!


विशेष म्हणजे २ लाखाहून अधिक सामाजिक कल्याण कार्यक्रम संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतानाच आवश्यक असलेल्या कोणत्याही मार्गाने आर्थिक समतोल साधण्यासाठी उदारमतवादी नेत्याच्या धोरणाची आवश्यकता आहे. परंतु, मिले यांच्या निर्णयाला कामगार संघटनांकडून विरोध होण्याची शक्यता असून एका संघटनेकडून २६ मार्चपासून संप सुरू करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे जेवियर मिले यांनी दि. १० डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली होती. परंतु, आर्थिक संकटातून जात असलेल्या देशाची अर्थव्यवस्था बदलण्याच्या दिशेने हे पाऊल उचलण्यात आल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच, मिले यांच्या कारकीर्दीत खाजगी क्षेत्रातील कामगारांच्या पगारात मोठी घसरण झाल्याचेही सरकारी अहवालात समोर आले आहे.