दिल्ली मद्य घोटाळा : आपच्या 'या' नेत्याच्या घरावर ईडीची छापेमारी!

27 Mar 2024 13:37:44
ed-raids-aap-leader-goa-incharge-deepak-singla

 
नवी दिल्ली :     दिल्ली मद्य घोटाळ्यात ईडीने आणखी एका आप नेत्याच्या दिल्लीतील निवास्थानावर टाकला आहे. आप नेता व गोवा प्रदेश प्रभारी दीपक सिंगला यांच्या निवासस्थानी छापा टाकत दिल्ली मद्य घोटाळ्याचा तपासात आणखी एक पाऊल टाकले आहे. तसेच, पंजाब उत्पादन शुल्क आयुक्तांच्या चंदीगढ येथील घरावरही सक्तवसुली संचालनालय(ईडी)कडून छापेमारी करण्यात आली आहे.

दरम्यान, २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रभारी दीपक सिंगला यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्यकडे जवळपास १० कोटी रुपयांची संपत्ती असून २५० कोटींहून अधिक अर्ज होते. त्याचबरोबर, त्यांचे दिल्लीत मिठाईचे दुकानदेखील आहे. सदर दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.



हे वाचलंत का? - दिल्ली मद्य घोटाळ्यातील पैसा गेला कुठे?, केजरीवाल 28 मार्चला कोर्टात सांगणार!


आता ईडीने दीपक सिंगला यांच्या घरावर छापे टाकले असून त्यांनी दिल्लीतील विश्वास नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. ते दिल्ली महापालिकेत आम आदमी पक्षाचे सहप्रभारीही आहेत. ते पक्षाचे गोवा आणि महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. दरम्यान, सिंगला यांच्या गोवा संबंधामुळेच त्यांच्यावर छापा टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मद्य घोटाळ्यात ईडीने म्हटले की, दिल्लीतील दारू धोरणातील अनियमिततेतून मिळालेला पैसा गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वापरण्यात आला होता. सिंगला हे गोव्यातील 'आप'चे निवडणूक प्रभारी होते, त्यामुळेच त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक केल्यानंतर हे छापे टाकण्यात येत आहेत. अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्या कोठडीबाबत त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.





Powered By Sangraha 9.0