दिल्ली मद्य घोटाळ्यातील पैसा गेला कुठे?, केजरीवाल 28 मार्चला कोर्टात सांगणार!

    27-Mar-2024
Total Views |
delhi-high-court-warns-aap-legal-cell-liquor-scam 
 

नवी दिल्ली :     दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालय(ईडी)कडून अटक करण्यात आली. दरम्यान, केजरीवाल ईडी कोठडीतून सरकार चालवित असून आता त्यांच्या पत्नी सुनीता यांनी मद्य घोटाळाबाबत वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या, दिल्ली मद्य घोटाळ्यातील पैसा कुठे गेला याबाबत केजरीवाल दि. २८ मार्च रोजी खुलासा करतील.




दरम्यान, ईडीकडून अटक झाल्यानंतर केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी दावा केला आहे की, सदर मद्य घोटाळ्यातील एकही पैसा छाप्यात सापडला नाही. तसेच, केजरीवाल यांच्या समर्थनार्थ जे वकील आंदोलन करत आहेत त्यांनी तसे करावे, पण त्यांच्या जबाबदारीवर, असे दिल्ली उच्च न्यायालयाने भाष्य केले आहे.


हे वाचलंत का? - श्री रामजन्मभूमी संकुलात प्लाटून कमांडर गोळी लागून जखमी. भाविकांमध्ये भीतीचे वातावरण


ईडीद्वारे करण्यात आलेल्या कारवाईचा 'आप'च्या लीगल सेलने विरोध सुरू केला असून या सेलने दिल्लीच्या सर्व जिल्हा न्यायालयांमध्ये निषेधाची घोषणा केली होती. यावर आता दिल्ली उच्च न्यायालयाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन सिंग आणि न्यायमूर्ती मनमीत प्रीतम सिंग अरोरा यांनी न्यायालयाच्या आवारात निदर्शने कशी करता येतील, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने आप लीगल सेलला फटकारताना म्हटले की, न्यायालयाच्या आवारात निदर्शने झाली तर त्याचे परिणाम अतिशय भयानक होतील, असे न्यायाधीशांनी सांगितले. दरम्यान, दिल्ली मद्य घोटाळ्याचा पैसा कुठे आहे, हे केजरीवाल न्यायालयात सांगतील, असे पत्नी सुनीता केजरीवाल यांनी सांगितले आहे. त्या म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल यांना या आदेशाचा विरोध होत असल्याने त्यांना खूप दुःख झाले आहे. एकाही छाप्यात या सदर घोटाळ्यातील एक पैसाही सापडला नसल्याचा दावा त्यांनी केला.