श्री रामजन्मभूमी संकुलात प्लाटून कमांडर गोळी लागून जखमी, भाविकांमध्ये भीतीचे वातावरण

    27-Mar-2024
Total Views |
ayodhya-firing-incident-pac-jawan-serious
 

 
नवी दिल्ली :       अयोध्येतील श्री रामजन्मभूमी संकुलात जवानाला गोळी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीएसी प्लाटून कमांडरला गोळी लागली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. जखमी प्लाटून कमांडरला लखनऊ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारांकरिता दाखल करण्यात आले असून लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार, ३२ व्या कॉर्प्स पीएसीच्या जवानाचे नाव राम प्रसाद आहे. ५३ वर्षीय राम प्रसाद हे अमेठीचे रहिवासी आहेत. सध्या ते श्री रामजन्मभूमीच्या सुरक्षेत तैनात असताना सदर प्रकार घडला आहे. अयोध्या राम मंदिर परिसरात पीएसी जवानाच्या छातीला AK-47 रायफलीतून गोळी लागली आहे.


हे वाचलंत का? - जम्मू-काश्मीरमधून 'AFSPA' हटविणार! केंद्रीय गृहमंत्र्यांचे पुढील योजनेबाबत सूतोवाच
 
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयजी अयोध्या रेंज प्रवीण कुमार यांनी सांगितले की, गोळी चुकून लागली. सैनिक त्याच्या बंदुकीची बॅरल साफ करत असताना चुकून त्याचा ट्रिगर दाबला आणि गोळी त्याच्या छातीतून गेली. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनास्थळी तैनात असलेल्या इतर जवानांनाही घटनेबाबत विचारणा केली जाणार आहे.

पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत असून घटनास्थळी तैनात असलेल्या इतर जवानांनाही घटनेबाबत विचारणा केली जाणार आहे. या जवानाबाबत समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, राम प्रसाद असे या जवानाचे नाव असून तो ३२ व्या कॉर्प्स पीएसीचा भाग आहे.