वंचितची पहिली यादी जाहीर! प्रकाश आंबेडकर 'या' मतदारसंघातून लढणार

    27-Mar-2024
Total Views |
 prakash ambedkar
 
मुंबई : वंचित बहुजन आघाडी अधिकृतरित्या महाविकास आघाडीतून बाहेर पडत आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे-पवारांच्या च्या घराणेशाहीवर टीका केली ते म्हणाले की, "ठाकरे-पवारांना 'वंचित'चा वापर घराणेशाही वाचवण्यासाठी करायचा होता, त्यांची घराणेशाही वाचवण्यास आम्ही नकार दिला आहे"
 
प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी महासंघाचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा मिळाल्याचा दावा केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "मी काल मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आम्ही त्यांच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात उमेदवार देणार आहोत. याबाबत ३० मार्चला घोषणा केली जाईल."
 
 
पुढे बोलताना वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील फॅक्टरला दुर्लक्षित करुन चालणार नाही. आम्ही त्यांना जरांगेंना सोबत घेण्यास सांगितले होते. पण महाविकास आघाडीने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.
 
प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची देखील घोषणा केली. प्रकाश आंबेडकर स्वत: अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढणार आहेत. त्यासोबतचं भंडारा-गोंदिया, गडचिरोली, बुलडाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा चार वाजेपर्यंत करण्यात येईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
 
 
वंचितच्या उमेदवारांची नावे
अकोला – प्रकाश आंबेडकर
भंडारा-गोंदिया – संजय केवट
गडचिरोली- - हितेश मडावी
चंद्रपूर – राजेश बेले
बुलडाणा – वसंत मगर
अमरावती – प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा – राजेंद्र साळुंके
यवतमाळ-वाशिम – खेमसिंग पवार