मोठी बातमी: टी + ० सेटलमेंटसाठी २५ शेअर्सची निवड

गुरूवारपासून या समभागांची T + 0 सेटलमेंटला सुरूवात

    27-Mar-2024
Total Views |

SEBI
 
मुंबई: सेबीने व्यवहार क्लिअरिंग सेवेत सुसूत्रता आणून कमीत कमी कालावधीत दिवसांच्या अखेर सेटलमेंट व्हावी यासाठी प्रायोगिक तत्त्वावर टी +० सेटलमेंटचे बेटा वर्जन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी गुरूवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सेबीने घेतला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी सर्वप्रथम २५ कंपनीच्या समभागांची ( शेअर्सची ) निवड केली गेली आहे.
 
यासाठी अंबुजा सिमेंट, बँक ऑफ बरोडा, बीपीसीएल, अशोक लेलँड, बजाज ऑटो यांसारख्या समभागांची निवड करण्यात आली आहे. सुरूवातीला ही सुविधा या २५ स्क्रिपस (Scrips) साठी उपलब्ध असून मर्यादीत स्वरूपाच्या ब्रोकरकडे ही सुविधा उपलब्ध असणार असल्याचे सांगितले जात आहे.
 
सध्या रोख इक्विटीसाठी टी + १ (T + 1) ही सेटलमेंटची पद्धत प्रचलित आहे. मार्च महिन्यात टी +२ मध्ये तीन टप्प्यांत सुधारणा होऊन टी +१ प्रणाली अस्तित्वात आली होती. त्यातील पुढील पाऊल म्हणून टी +० प्रणाली अस्तित्वात येणार आहे. यासाठी लागणारी मुलभूत सुविधा बांधण्याचे काम सेबीने सुरू केले आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने यांची अंमलबजावणी करत टी + ०
 
(त्याच दिवशी व्यवहारांची सेटलमेंट) करण्याच्या दिशेने भारतीय इक्विटी बाजार जाऊ शकते.
 
टी + ० सेटलमेंट सुरू झालेल्या समभागांची यादी -
 
१) अंबुजा सिमेंट
२) अशोक लेलँड
३) बजाज ऑटो
४) बँक ऑफ बरोडा
५) भारत पेट्रोलियम
६) बिर्लासॉफ्ट
७) सिप्ला
८) कोफोरेज
९) डिवीज
१०) हिंदाल्को
११) इंडियन हॉटेल्स
१२) जेएसडब्लू
१३) एल आय सी हाउसिंग फायनान्स
१४) एलटीआय
१५) एमआरएफ
१६) नेसले इंडिया
१७) एनएमडीसी
१८) ओएनजीसी
१९) स्टेट बँक ऑफ इंडिया
२०) पेट्रोनेट एलएनजी
२१) संमवर्धना मदरसन इंटरनॅशनल
२२) टाटा कम्युनिकेशन
२३) ट्रेंट लिमिटेड
२४) युनियन बँक ऑफ इंडिया
२५) वेदांता लिमिटेड