शेअर बाजार विश्लेषण: सेन्सेक्स निफ्टी घसरला गुंतवणूकदारांचा सावधानतेचा इशारा!

रियल्टी मेटल समभागात वाढ, बँक निफ्टीत घसरण

    26-Mar-2024
Total Views |

Stock Market
 
Stock Market Analysis - 
 
मोहित सोमण
 
मुंबई: इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज घसरण कायम राहिली आहे. होळीच्या विश्रांतीनंतर बाजाराने वापसी केली तरी खरी परंतु सेन्सेक्स व निफ्टी आज कमी पातळीवर अखेरच्या सत्रात पोहोचला आहे.आज सकाळच्या सत्रापासून बाजारात नकारात्मकता कायम राहून सेन्सेक्स निफ्टीतील पातळी कमी होत गेली. तुलनेत बंद पडण्याच्या वेगात अखेर घट होत शेअर बाजार स्थिरावला आहे.
 
एस अँड पी बीएससी (BSE) सेन्सेक्स बँक निर्देशांकात २९३.१६ अंशाने घसरण होत ५२८१२.६० पातळीवर बँक निफ्टी स्थिरावला आहे. तर एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांक ३६१.६४ अंशाने घसरत ८२४७०.३० पातळीवर पोहोचला आहे.
 
एनएससीवर (NSE) वर निफ्टी ५० हा ९२.०५ अंशाने घसरत २२००४.७० पातळीवर पोहोचला आहे. बीएससीवरील बहुतांश निर्देशांक 'लाल' रंगात कायम राहिले आहेत.
 
बँक निफ्टी निर्देशांकावर मुंबई तरूण भारतला प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट कुणाल शहा म्हणाले,"बँक निफ्टी निर्देशांकाने कडेकडेने ट्रेडिंगसह कट केलेल्या आठवड्याची मंदावलेली सुरुवात अनुभवली.४७००० वर त्वरित प्रतिकार नोंदविला गेला आहे आणि या पातळीच्या वरच्या निर्णायक बंदमुळे ४८००० चिन्हाकडे लक्षणीय शॉर्ट-कव्हरिंग रॅली सुरू होऊ शकतात. याउलट, त्वरित समर्थन सुमारे स्थित आहे. ४६५०० - ४६४५० झोन सपोर्ट एरियाच्या खाली भंग केल्यास ५६००० पातळीच्या दिशेने डाउनसाइड गती वाढू शकते."
 
बीएससी मिडकॅप ०.७१ टक्क्याने (२७४.६४ अंशाने) वाढत ३९०७५.८७ पातळीवर पोहोचला आहे तर बीएससी स्मॉलकॅप निर्देशांक ०.११ टक्क्याने (४५.०५ अंशाने) घसरत ४२७२६.२२ पातळीवर पोहोचला आहे.एनएससीवरील स्मॉलकॅपमध्ये ०.१४ ने वाढत ६९८१.६० पातळीवर पोहोचला आहे.एनएससीवर मिडकॅप १.०८ टक्क्याने वाढत १३४७४.१० पातळीवर पोहोचला आहे.
 
सेक्टोरल इंडायसेसमध्ये (क्षेत्रीय निर्देशांकात) देखील आज संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. निफ्टीवरील बँक निर्देशांकातही ०.५६ टक्क्याने घट होत ४६६००.२० पातळीवर बँक निफ्टी बंद झाला आहे. विशेषतः ऑटो (०.०४ %) एफएमसीजी (०.१६ %) आयटी (०.६२ %) मिडिया (१.६६ %) फार्मा (०.०३%) प्रायव्हेट बँक (०.५० %) या क्षेत्रीय निर्देशांकात आज घसरण झाली असून आज फायनांशियल सर्विसेस समभागात कुठलाही बदल न होता ' जैसे थे' राहिला.
 
सर्वाधिक वाढ रियल्टी (१.५७ %) समभागात झाला असून त्यानंतर गुंतवणूकदारांना फायदा हेल्थकेअर (०.३९ %) , कनज्यूमर ड्युरेबल्स (०.४६ %) मेटल (०.३७ %) तेल गॅस (०.७३ %) ने वाढ झाली आहे.
 
बीएससीवर बाजारी भांडवल (मार्केट कॅपिटलायझेशन)३८२ लाख कोटींहून अधिक असून एनएससीवरील बाजारी भांडवल ३७९.४१ लाख कोटी इतके राहिले आहे. आज बाजारातील परिस्थिती पाहता बीएससीवरील ४०९० समभागांचे (शेअर) चे ट्रेडिंग झाले असून त्यापैकी १४१३ समभागात वाढ झाली तर २५४६ कंपनीच्या समभागांच्या मूल्यांकनात घसरण झाली आहे. १
 
४५ कंपनीच्या समभागांचे मूल्यांकन मागील ५२ आठवड्यातील सर्वाधिक राहिले असून १०२ कंपनीच्या समभागांचे मूल्यांकन ५२ आठवड्यातील सर्वात कमी राहिले आहे. ३२० कंपन्यांचे समभाग आज अप्पर सर्किटवर राहून ३५४ कंपनीचे समभाग आज मात्र लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
एनएससीवर २७४२ कंपनी समभागांचे ट्रेडिंग झाले असून ९१० समभागांचे आज मूल्यांकन वाढले तर १७३३ समभागांचे मूल्यांकन मात्र घसरले आहे. यातील ६२ कंपनीच्या समभागांचे आज मूल्यांकन ५२ आठवड्यात सर्वाधिक राहिले आहे तर ११७ कंपनीच्या समभागांचे मूल्यांकन मात्र आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरले आहेत. एनएससीवर ६२ कंपनीच्या समभागाचे मूल्य अप्पर सर्किटवर पोहोचले असून १४९ कंपनीच्या समभाग मात्र लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
दिवसभरातील सत्रात बीएससीवर निर्देशांकात सर्वाधिक पातळी ७२६७८.३८ पर्यंत राहिली तर एनएससीवर सर्वाधिक पातळी २२०७३.२० इतकी राहिली आहे.
 
बीएससीवर बजाज फायनान्स, लार्सन, एनटीपीसी, एक्सिस बँक, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, नेसले, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह या समभागात झाली असून सर्वाधिक नुकसान पॉवर ग्रीड, विप्रो,एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा, एशियन पेटंस, टीसीएस, टेक महिंद्रा, एम अँड एम, एसबीआय, सनफार्मा, टायटन, एचयुएल, आयटीसी, जेएसडब्लू स्टील या समभागात झाले आहे.
 
एनएससीवर सर्वाधिक फायदा बजाज फायनान्स, हिंदाल्को, अदानी पोर्टस, ब्रिटानिया, एनटीपीसी, बजाज फायनान्स, कोल इंडिया, बीपीसीएल, एक्सिस बँक, ग्रासिम, नेसले अदानी एंटरप्राईज या समभागावर झाला असून मात्र भारती एअरटेल, पॉवर ग्रीड, आयशर मोटर्स, विप्रो, डिवीज, भारती एअरटेल, कोटक महिंद्रा, एचडीएबसी बँक, डॉ रेड्डीज, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एशियन पेटंस, एसबीआय, अपोलो हॉस्पिटल या समभागात मात्र गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागले आहे.
 
अधिकृत माहितीनुसार, आज भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत प्रति डॉलर ८३.३५ रुपयांना बंद झाला आहे. आज दिवसभरात क्रूड तेलाच्या भावात देखील वाढ झाल्याने आशियाई बाजारातील तेलाच्या किंमतीत फरक पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मार्चमध्ये डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ०.६ टक्क्याने खालावला असला तरी आज अखेरीस रुपया ३२ पैशाने वधारत ८३.३५ रुपयांना बंद झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड तेलाच्या किंमत ८५.६५ रुपये प्रति बॅरेल गेल्या आहेत.संध्याकाळी क्रूड निर्देशांकात ०.१२ सेंट्सने घसरण झाली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर ही दरवाढ कायम राहिली आहे.
 
भारतातील देशांतर्गत प्रतिकूल परिस्थिती, क्रूड तेलाच्या भावात झालेली वाढ यामुळे आज बाजारात नकारात्मक प्रभाव कायम राहिला आहे.तज्ञांच्या मते पाच दिवसांपूर्वी भारतीय विदेशी मुद्रा वाढल्याने रुपया घसरण्याचा वेग आज सावरला असून रुपयाने ३३ पैशांची रिकवरी भारत करू शकला आहे. मिडकॅप स्मॉलकॅप निर्देशांकात आज सुधारणा कायम राहिली असली तरी बाजारात आज गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासारखी आज विशेष परिस्थिती दिसली नाही.
 
याशिवाय भारताच्या विदेशी मुद्रा वाढल्या असल्यातरी युएस मध्ये अर्थव्यवस्थेतील नकारात्मक परिणाम व रशिया युक्रेन, तेलाचा तुटवडा अशा विविध कारणांमुळे बाजारात आज तेजी दिसली नाही.
 
आजच्या शेअर बाजारातील परिस्थितीविषयी मुंबई तरूण भारतला प्रतिक्रिया देताना बोनझा पोर्टफोलिओ लिमिटेडचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, ' आज निफ्टी ०.४२ % ने २२००४ वर नकारात्मक नोट वर बंद झाला तर सेन्सेक्स ०.५० % ने खाली ७२४७० वर बंद झाला. मंदीच्या बाजारपेठेत देखील निफ्टी रिॲलिटी हे क्षेत्र होते जे आज अनुक्रमे १.५७ % ने वाढले.
 
भारती हेक्साकॉम ही टेलिफोन आणि इंटरनेट सेवा प्रदाता आणि भारती एअरटेलची उपकंपनी ४२७५ कोटी रुपयांच्या ऑफरसह प्राथमिक बाजारात प्रवेश करण्यास तयार आहे. अँकर बुक २ एप्रिल रोजी एक दिवसासाठी उघडेल आणि आगामी आर्थिक वर्षाचा पहिला सार्वजनिक अंक, FY25,३ एप्रिल रोजी उघडेल. IPO चा सदस्यत्व कालावधी ३एप्रिल रोजी सुरू होईल आणि ५ एप्रिल रोजी संपेल. प्राइस बँड रु ५४० -५७० प्रति शेअर इश्यूची किंमत बँड म्हणून सेट केली आहे.IPO मध्ये कोणताही नवीन इश्यू घटक नाही; ही फक्त विक्रीसाठी ऑफर (OFS) आहे.
 
बजाज फायनान्स, हिंदाल्को इंडस्ट्रीज, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, अदानी पोर्ट्स आणि एल अँड टी हे निफ्टीमध्ये सर्वाधिक नफा मिळवणारे होते, तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, आयशर मोटर्स, भारती एअरटेल, कोटक महिंद्रा बँक आणि विप्रो यांना तोटा झाला.'
 
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी मुंबई तरूण भारतला प्रतिक्रिया देताना रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे एसव्हीपी अजित मिश्रा म्हणाले, ' प्रचलित एकत्रीकरण टप्प्यात सुरू राहून बाजाराने निस्तेजपणे व्यापार केला आणि जवळपास अर्धा टक्का गमावला. सपाट सुरुवात झाल्यानंतर, निफ्टी शेवटपर्यंत एका अरुंद श्रेणीत फिरला आणि अखेरीस २२००० च्या पातळीवर बंद झाला. दरम्यान, क्षेत्रीय आघाडीवर संमिश्र ट्रेंडने व्यापाऱ्यांना वेठीस धरले, ज्यामध्ये रिअल्टी आणि तेल आणि वायू उच्च तर आयटी आणि बँकिंग लाल रंगात संपले. व्यापक निर्देशांकांनी बेंचमार्क निर्देशांकाला मागे टाकले आणि ०.४ % -१.०२% च्या श्रेणीत वाढले.
 
प्रचलित श्रेणी म्हणजेच २१,८५०-२२,२०० पातळीपासून निर्णायक ब्रेक दिसेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी संकेत हे एकत्रीकरण टोनच्या बाजूने आहेत. दरम्यान, व्यापाऱ्यांनी त्यांचे एक्सपोजर मर्यादित केले पाहिजे आणि हेज्ड ट्रेडला प्राधान्य द्यावे, इंडेक्स मेजर आणि मोठ्या मिडकॅप्सवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.'
 
आजच्या निफ्टी पातळीबाबत मुंबई तरूण भारतला प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले, "निफ्टी दिवसभर बाजूला राहिला कारण बाजारातील सहभागी सुट्टी-छोट्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी गोंधळात पडले. तथापि, निर्देशांक दैनंदिन चार्टवर गंभीर मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर बंद झाल्यामुळे अल्प कालावधीसाठी हा कल सकारात्मक राहिला.शेवटी, समर्थन अल्प मुदतीसाठी २१८४० वर ठेवले आहे, ज्याच्या खाली कमकुवतपणा येऊ शकतो. वरच्या बाजूस, प्रतिकार २२२४० -२२३०० वर दिसून येतो."
 
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात आगामी अध्यक्षीय निवडणूकीआधी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच अमेरिकेतील महागाई नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेन सरकारचे प्रयत्न असणार आहेत. या कारणांमुळे गुंतवणूकदारांनी सावधतेचा पवित्रा घेत आज मोठे निर्णय घेतले नाहीत. याशिवाय युएसमध्ये ड्युरेबल्स गुड्स व कनज्यूमर कॉन्फिडन्स आज अमेरिकी सरकार जाहीर करणार आहे.
 
यासाठी सरकारकडून तुलनात्मक पर्सनल कंजमशन एक्स्पेंडिचर (Personal Consumption Expenditure) डेटा येत्या शुक्रवारी बाजारात दाखल होईल परिणामी निवडणूकींचा धाकधूकीत त्याचा आशियाई बाजारातील गुंतवणूकीत काय फरक पडू शकतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
गोपालपूर पोर्टसचे आज अदानी पोर्टसने अधिग्रहण केल्यानंतर कंपनीचा समभाग १.८३ टक्क्याने वाढत १३०५ रूपये प्रति समभागावर पोहोचला आहे. याशिवाय बजाज फायनान्स (२.२ टक्के) , हिंदाल्को (१.९९ टक्के) , ब्रिटानिया (१.९८ टक्के) लार्सन (१.४५ टक्के) बीपीसीएल (१.१९ टक्के) वधारला आहे.
 
आजच्या बाजारातील स्थितीविषयी विश्लेषण करताना जेष्ठ मार्केट अभ्यासक अजित भिडे म्हणाले , 'आपल्या बाजारात पूर्णपणे अमेरिकन महागाई संदर्भातील २९ तारखेला येणाऱ्या (PCE ) Personal Consumption Index बदल अहवालाच्या व फेडच्या घडामोडींवर लक्ष ठेवुन आहे .
 
जर इंडेक्स वाढलेला असेल तर व्याजदर कमी होणं कठीण होईल. म्हणजेच अमेरिकेतील व्याजदर कमी होण्यास या निर्देशांकात महत्वपूर्ण रोल आहे. या झाल्या वरवरच्या दाखवल्या जाणाऱ्या घटना, आजही आपण ऑल टाईम हाय चे नफा बुकिंग करित आहोत.आज सर्व क्षेत्रातील शेअर ची विक्री पहायला मिळते आहे. अशीच परिस्थिती काही दिवस राहील जोपर्यंत खरेदीकरीता आकर्षक दर येत नाहीत तोपर्यंत एक दिवस मोठी विक्री एक दिवस ईंडेकस ची तेजी पण बाकी बाजार डाउनसाईड असा कही काळ राहील. फेडनी जर काही २९ तारखेचया कोॅमेटरीत पाॅझिटिव दिसलं तर बाजार लवकर स्थिरस्थावर होईल. पण नॅचरली पडझड दोन महिने राहीली तरच बाजार सशक्तपणे २०२४ तेजीत राहील आजही केमिकल, डाईज कमोडीटी असे सेक्टर तेजी पासुन दुर आहेत.
 
आजच्या बाजारातील स्थितीविषयी विश्लेषण करताना जेष्ठ मार्केट अभ्यासक अजित भिडे म्हणाले, 'आपल्या बाजारात पूर्णपणे अमेरिकन महागाई संदर्भातील २९ तारखेला येणाऱ्या (PCE) Personal Consumption Index बदल अहवालाच्या व फेडच्या घडामोडींवर लक्ष ठेवुन आहे .जर इंडेक्स वाढलेला असेल तर व्याजदर कमी होणं कठीण होईल.म्हणजेच अमेरिकेतील व्याजदर कमी होण्यास या निर्देशांकात महत्वपूर्ण रोल आहे.या झाल्यावरवरच्या दाखवल्या जाणाऱ्या घटना,आजही आपण ऑलटाईम हाय चे नफा बुकिंग करित आहोत.
 
आज सर्व क्षेत्रातील शेअर ची विक्री पहायला मिळते आहे.अशीच परिस्थिती काही दिवस राहील जोपर्यंत खरेदीकरीता आकर्षक दर येत नाहीत तोपर्यंत एक दिवस मोठी विक्री एक दिवस ईंडेकस ची तेजी पण बाकी बाजार डाउनसाईड असा काहीकाळ राहील. फेडनी जर काही २९ तारखेचया कोॅमेटरीत पाॅझिटिव दिसलं तर बाजार लवकर स्थिरस्थावर होईल. पण नॅचरली पडझड दोन महिने राहिली तरच बाजार सशक्तपणे २०२४ तेजीत राहिल.आजही केमिकल, डाईज कमोडीटी असे सेक्टर तेजी पासुन दुर आहेत. मोठया तेजी करीता पुढील 2-3 महीने यामधे ईडेंकस 65000 च्या जवळ यायला पाहिजे निफटी १९५०० - २०००० यायला पाहिजे.'