पाकिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला; ६ चिनी नागरिकांचा मृत्यू

    26-Mar-2024
Total Views |
 china
 
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये मोठा आत्मघातकी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. गाला जिल्ह्यातील बेशम शहरात चीनी नागरिकांच्या ताफ्यावर हा स्फोट झाला. यामध्ये ५ चिनी नागरिकांसह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेले वाहन चिनी नागरिकांच्या वाहनात घुसवून हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
 
पाकिस्तानच्या स्थानिक मीडिया डॉननुसार, चिनी अभियंते वाहनात बसले होते, ते सर्व इस्लामाबादहून खैबर पख्तुनख्वा प्रांतातील दासू येथे जात होते जेथे धरण बांधण्याचे काम सुरू होते. कामच्या ठिकाणावर जातानाच हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.
 
 
या संदर्भात प्रादेशिक पोलिस प्रमुख मोहम्मद अली गंडापूर म्हणाले, "या हल्ल्यात पाच चिनी नागरिक आणि त्यांचा पाकिस्तानी ड्रायव्हर ठार झाला." पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात नेल्याचे सांगितले. हे आत्मघाती हल्लेखोर कुठून आले आणि त्यांनी हा हल्ला कसा केला, याचा तपास सुरू आहे. आतापर्यंत अशी माहिती आहे की स्फोटानंतर वाहन खड्ड्यात पडले आणि आग लागली.
 
पाकिस्तानमधील हा हल्ला नौदलाच्या हवाई तळावरील हल्ल्याच्या काही तासांनंतर झाला आहे. घटनेत एक जवान शहीद झाल्याची माहिती आहे आणि ५ हल्लेखोर मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे. तर, या घटनेत ५ चिनी नागरिक आणि १ पाकिस्तानी ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. काही दृश्येही समोर आली आहेत ज्यात वाहनांमधून धूर निघताना दिसत आहे. हा हल्ला कोणी केला हे अद्याप समजू शकलेले. याआधी नौदलाच्या हवाई तळावर करण्यात आलेला हल्ला बलुच लिबरेशन आर्मीकडून करण्यात आलेला आहे.