पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भुतानचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
22-Mar-2024
Total Views |
नवी दिल्ली : भुतानचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले विदेशी शासनप्रमुख ठरले आहेत. भुतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी पंतप्रधान मोदी यांना शुक्रवारी 'ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो' देऊन सन्मानित केले. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी ते राजधानी थिम्पू येथील ताशिचो जोंग पॅलेसमध्ये पोहोचले. येथे त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी भूतानचे राजा जिग्मे वांगचुक यांची भेट घेतली. तत्पूर्वी, पारो विमानतळावर पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी त्यांचे स्वागत केले.
भुतानच्या राजांतर्फे 'सर्वोच्च नागरी सन्मान' देऊन सन्मानित केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, भारतीय म्हणून माझ्या आयुष्यातील आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मला भूतानच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. जेव्हा आपल्याला दुसऱ्या देशाकडून पुरस्कार मिळतो तेव्हा आपल्याला असे वाटते की आपले दोन्ही देश योग्य दिशेने जात आहेत. आमच्या १४० कोटी भारतीयांना माहित आहे की भतानचे लोक त्यांच्याच कुटुंबाचे सदस्य आहेत. भारत आणि भुतान यांचा समान वारसा आहे. भारत ही भगवान बुद्धांची भूमी आहे, त्यांचे तपश्चर्येचे निवासस्थान आहे. भारत ही भूमी आहे जिथे बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले. तर भुतानने भगवान बुद्धांच्या शिकवणी आत्मसात केल्या आणि त्यांचे जतन केल्या आहेत, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ - २३ मार्च २०२४ या कालावधीत भूतानच्या शासकीय दौऱ्यावर असून आज ते पारो येथे दाखल झाले. भारत आणि भूतान यांच्यातील नियमित उच्चस्तरीय आदानप्रदान आणि सरकारच्या 'शेजारी प्रथम' धोरणावर भर देणे या अनुषंगाने हा दौरा आहे. भारत सरकारच्या सहकार्याने थिम्पू येथे बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक ग्यालत्सुएन जेत्सुन पेमा माता बालक रुग्णालयाचे उद्घाटनही पंतप्रधान करतील.
दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भुतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी हुआयामी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. यावेळी अक्षय ऊर्जा, कृषी, युवा देवाणघेवाण, पर्यावरण आणि वनीकरण आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य आणखी वाढवण्यावर एकमत झाले. बैठकीपूर्वी, दोन्ही नेत्यांनी ऊर्जा, व्यापार, डिजिटल कनेक्टिव्हिटी, अंतराळ, कृषी, याविषयीच अनेक सामंजस्य करार